एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात

By Admin | Updated: June 7, 2014 00:17 IST2014-06-06T23:48:51+5:302014-06-07T00:17:53+5:30

चिखली नगरपरिषद पोटनिवडणुकीत एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात.

Three candidates for one seat in the fray | एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात

एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात

चिखली : काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश शिंगणे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नगर परिषदेच्या प्रभाग १ मधील २९ जून रोजी होवू घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून १, शिवसेनेकडून १ तर अपक्ष १ असे तीन नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.
२९ जून रोजी या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक अंतर्गत मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. प्रारंभी अविरोध होण्याची शक्यता असताना शेवटच्या दिवशी आलेल्या दोन अर्जांमुळे आता याठिकाणी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. निवडणुक रिंगणात दिवंगत नगरसेवक प्रकाश शिंगणे यांच्या पत्नी सुनिता प्रकाश शिंगणे यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादीने त्यांना पाठींबा दर्शविला आहे.
तर शिवसेनेकडून माजी नगसेवक श्याम शिंगणे यांच्या पत्नी सुनिता शाम शिंगणे यांनी तर अँड.वैशाली भंडारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार हांडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, दासू बनसोडे, बाबुराव जाधव, नितीन बढे, रूद्राक्ष, जोशी काम पाहत आहेत.

Web Title: Three candidates for one seat in the fray