शिक्षक पुरस्कारांविनाच साजरा होणार जिल्हा परिषदेचा शिक्षकदिन

By Admin | Updated: September 5, 2015 00:01 IST2015-09-05T00:01:15+5:302015-09-05T00:01:15+5:30

पुरस्कारांसाठी प्रस्ताव संख्येने कमी आल्यामुळे याहीवर्षी शिक्षकदिनी हा पुरस्कार सोहळा होणार नाही.

Teachers' Day for Zilla Parishad will be celebrated without teacher award | शिक्षक पुरस्कारांविनाच साजरा होणार जिल्हा परिषदेचा शिक्षकदिन

शिक्षक पुरस्कारांविनाच साजरा होणार जिल्हा परिषदेचा शिक्षकदिन

बुलडाणा : शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, कार्यक्रमांचेही आयोजन होते; मात्र सर्व शिक्षकांना प्रतीक्षा असते ती शिक्षक गौरव पुरस्काराची. ह्यजिल्हा आदर्श शिक्षकह्ण असे काही वर्षांंपूर्वी नामाभिधान असलेले हे पुरस्कार आता ह्यजिल्हा शिक्षक गौरवह्ण या नावाने दिले जात असले तरी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव संख्येने कमी आल्यामुळे याहीवर्षी शिक्षकदिनी हा पुरस्कार सोहळा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून किमान एक अशा १३ शिक्षकांना जिल्हा शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून १ ऑगस्टपर्यंंत उपक्रमशील शिक्षकांचे प्रस्ताव आमंत्रित केले जातात. या प्रस्तावांवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती यांच्या नेतृत्वातील समिती निर्णय घेते. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर पुरस्कारांचे वितरण केले जाते. सन २0१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा शिक्षक गौरव पुरस्काराकरिता केवळ पाच प्रस्ताव आले. प्रस्तावांची ही संख्या लक्षात घेता, निवड समिती तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी जिल्हाभरात नवोपक्रम स्पर्धेत सहभाग घेणार्‍या शिक्षकांनाही अशा पुरस्काराबाबत माहिती द्यावी व प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आता शिक्षक गौरव पुरस्कारासाठी पुन्हा प्रस्ताव आमंत्रित केले असून, ३0 नोव्हेंबरपर्यंंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षकदिनी हा सोहळा व्हावा, अशी इच्छा शिक्षकांची असली तरी त्यांच्याकडूनच प्रस्ताव नसल्यामुळे हा सोहळा आता नोव्हेंबर महिन्यात येणार्‍या राष्ट्रीय शिक्षकदिनी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रस्तावांची प्रक्रिया संपणार तरी कधी? उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांना आपण केलेल्या कार्याचे सादरीकरण स्वत: करावे लागते. या सादरीकरणाच्या प्रस्तावावरच जिल्हा परिषद जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कारासाठी निवड करते. आपण केलेल्या कामाचे आपणच कौतुक करण्यासारखा हा प्रकार अनेक चांगल्या शिक्षकांना आवडत नाही. त्यामुळे असे अनेक शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहतात. त्यामुळेच चांगल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्तावच सादर केले नाहीत. जिल्हा परिषदेमार्फत प्रस्ताव मागविण्याची ही प्रक्रिया संपविण्याची गरज आता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेमार्फत एक समिती गठित करुन, त्या समितीने चांगल्या शिक्षकांचा शोध घेऊन पुरस्कार दिला, तर ते अधिक प्रभावी ठरू शकते, अशी मागणी अनेक शिक्षकांची आहे.

Web Title: Teachers' Day for Zilla Parishad will be celebrated without teacher award