शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणारा सहाय्यक संचालक निलंबीत

By admin | Updated: November 30, 2014 23:23 IST

मासिक मानधनाचे बिल काढण्यासाठी स्विकारली होती लाच.

बुलडाणा : पाच हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आलेले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे सहाय्यक संचालक शिवाजी निंबाळकर यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. त्यांचा पदभार मेहकर येथील सहाय्यक सरकारी वकिल गायकवाड यांचेकडे देण्यात आला. सहाय्यक सरकारी वकिल रामदास तिडके यांचे मासिक मानधनाचे बिल काढण्यासाठी जिल्हा सहाय्यक संचालक शिवाजी निंबाळकर यांनी ५ हजार रूपयाची लाच मागीतली होती. २७ नोव्हेंबर रोजी ५ हजार रुपये लाचेची रक्कम घेताना अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून निंबाळकर यांना रंगेहात पकडले होते. याचा अहवाल लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक यु.के. जाधव यांनी मुंबई कार्यालयाला पाठविताच निंबाळकर यांना मुंबईच्या संचालक, सहाय्यक अभियोग संचालनालय यांनी निलंबीत केल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टामध्ये सरकारी वकीलांच्या रिक्त जागा मानधन तत्वावर भरल्या जातात. हे मानधन तत्वावर काम करणारे सहाय्यक सरकारी वकील जिल्हा सहाय्यक संचालक यांच्या अंतर्गत काम करतात. सिंदखेडराजा न्यायालयात सहाय्यक सरकारी वकिल म्हणून शिवाजी निंबाळकर काम पहात होते. तर त्यांच्याकडेच जिल्हा सहाय्यक संचालक पदाचाही पदभार होता. त्यामुळे सरकारी वकिलांचे मानधनाचे बील काढण्याचे काम निंबाळकर यांचेकडे होते. यासाठी निंबळकर हे जिल्हाभरात नियुक्त केलेले सहाय्यक सरकारी वकिल यांना नेहमीच पैशाची मागणी करीत होते. त्यामुळे सहाय्यक सरकारी वकिल त्रस्त झाले होते. त्यातीलच एक रामदास तिडके यांनी निंबाळकर यांची अकोला येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अकोला एसीबीचे उपअधिक्षक यु.के.जाधव यांनी सापळा रचून शिवाजी निंबाळकर यांना २७ नोव्हेंबर रोजी बुलडाणा येथील कारंजा चौकात ५ हजार रुपयाची लाच घेताना पकडले. तर २९ नोव्हेंबर रोजी निंबाळकर यांना संचालक सहाय्यक अभियोग संचालनालय मुंबई यांनी निलंबीत केले आहे.