शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाला दिवाळीत दहा लाचांचा तोटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 13:06 IST

एसटी महामंडळाला तब्बल १० लाख ३७ हजार ५४७ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एसटी महामंडळाच्या वतीने दिवाळीच्या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात येते. दरवर्षी या भाडेवाढीच्या माध्यमातून उत्पन्नात भरघोस वाढ पाहायला मिळते. यावर्षी मात्र दिवाळीवर अतिवृष्टीचे सावट निर्माण झाले असल्याचे दिसून आले. परिणामी एसटीच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत यंदा घट झाल्याचे चित्र आहे. एसटी महामंडळाला तब्बल १० लाख ३७ हजार ५४७ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास अशी धारणा सर्वसामान्यांमध्ये असल्याने एसटीने प्रवास करण्यावर सर्वांचा भर असतो. कामानिमित्त बाहेरगावी राहत असलेले दिवाळीच्या कालावधीत मूळ गावी येत असतात. या प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने मध्यवर्ती (मुंबई) कार्यालयाकडून बुलडाणा विभागातून लांब पल्ल्याच्या २२ बसफेऱ्यांना मान्यता देण्यात आली होती. यापैकी ३ बसफेºया रद्द झाल्याने १९ फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात आली. नियंत्रण समिती (अमरावती) कडून १० बसफेºयांची व्यवस्था करण्यात आली होती. यापैकी केवळ ६ बसफेºया प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. यामध्ये मलकापूर-यवतमाळ एक, जळगाव जामोद-यवतमाळ दोन, बुलडाणा-यवतमाळ एक, बुलडाणा-पुसद एक तर बुलडाणा-नागपूर या एका बसफेरीचा समावेश आहे. यावर्षी दिवाळी २७ आॅक्टोबर रोजी असल्याने २५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. गतवर्षी दिवाळीच्या कालावधीत एसटी महामंडळाला ६ कोटी ५ लाख ३४ हजार ०११ तर यावर्षी ५ कोटी ४ लाख ९६ हजार ४६४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात १० लाख ३७ हजार ५४७ रुपयांनी घट झाली आहे. यामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.वेळेवर बदलावे लागले मार्गदिवाळीच्या कालावधीत सतत पाऊस सुरू असल्याने अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने बसचे काही शेड्यूल रद्द करावे लागले. काही बसच्या मार्गात बदल झाल्याने याचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे प्रवाशांनी इतर खासगी वाहनांचा आधार घेतला. या सर्व परिस्थितीचा फटका एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला बसला आहे.

एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी यादृष्टीने दरवर्षी १० टक्के भाडेवाढ करण्यात येत असते. हा उद्देश साध्य करण्यात बुलडाणा विभाग नेहमीच यशस्वी होतो. यंदा मात्र पावसामुळे अनेक बसचे शेड्यूल रद्द करावे लागल्याने उत्पन्नात घट आली आहे.-ए. यु. कच्छवे,वाहतूक नियंत्रक

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी