शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

'एसटी' प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार युपीएससीसाठी आर्थिक सहाय्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 16:16 IST

उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी देण्यात येणार आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमाती मधील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना यावर्षी सुरु करण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. अनुसूचित जमाती मधील उमेदवारांना आर्थिक सहाय्य मिळणार असल्याने त्याला आधार झाला आहे.  योजनेअंतर्गत युपीएससी पुर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या २५ अशा अनुसूचित जमातीमधील एकूण ५० उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. सन २०२०-२१ पासून ही योजना लागू होणार आहे.  आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करुन थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा,  या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रशासकीय अधिकारी व्हावे  योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक सहाय्याअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या अनुसूचित जमातीमधील तरुणांसाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी व्यक्त केला आहे.   इच्छूक पात्र विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्तरावरुन अर्ज करता येणार आहे,  असे सहा. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजनाStudentविद्यार्थी