शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

कधी स्टेअरींग जाम, तर कधी चाक निखळते; भंगार बस धावतात रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:45 IST

हा कुठला सुरक्षित प्रवास? असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील सातही आगारातील बहुतांश एसटी बस नादुरूस्त आहेत. कधी स्टेअरींग जाम, तर कधी चाक निखळण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ‘एसटीचा प्रवास, सुखी प्रवास’ असा सर्वसामान्यांचा असलेला समज आता खोटा ठरत आहे. याउलट हा कुठला सुरक्षित प्रवास? असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील सातही आगारांमधून दररोज ४५० शेड्यूल असते. या सर्व बसेसची आठवड्याला, महिन्याला व दर तीन महिन्यातून सर्व्हीसींग करणे गरजेचे असते. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी हातणी गावाजवळ चिखली-बुलडाणा या धावत्या बसचे चाक निखळल्याची घटना घडली. बसच्या वेगावर नियंत्रण मिळविण्यात चालकाला यश आल्याने सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. ही घटना ताजी असतानाच १६ नोव्हेंबर रोजी बुलडाणा शहरातील क्षय आरोग्य धामनजीकच्या वळणावर बुलडाणा-अजिंठा बसचे स्टेअरींग जाम झाल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला असून चालक, वाहक व प्रवासी सुखरूप आहेत.फिटनेस सर्टीफिकेटवरही प्रश्नचिन्हबस नादुरूस्त असताना या बसेसना रस्त्यावर धावण्यासाठी फिटनेस सर्टीफिकेट देणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भंगार गाड्यांकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या वाढत आहे. अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नादुरूस्त बसवर तसे शिक्कामोर्तब करणे कटाक्षाने पाळले पाहिजे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी बसची तपासणी करताना नादुरूस्त बसला फिटनेस सर्टीफिकेट नाकारल्यास असे प्रकार नियंत्रणात आणण्यात एसटी महामंडळाला काही प्रमाणात का होईना पण यश येईल.बसचे चाक निखळणे व स्टेअरींग जाम होणे, अशा घटना नेहमी घडत नाहीत. एसटी बसच्या चाकाचा एक्सल तीन ते चार सेंटीमीटर जाडीचा असतो. हा एक्सल तुटल्यास चाक निघाल्याचा प्रकार घडतो. तर एसटी बसच्या स्टेअरींगमध्ये आॅईल टँक असते. या आॅईल टँकमध्ये धूळ साचल्यास स्टेअरींग जाम होते. सर्व्हीसींगला विलंब झाल्यास देखील बसचे स्टेअरींग जाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण शक्यतोपर सर्व बसेसची नियमितपणे सर्व्हीसींग करण्यात येते.- संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी