शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या गाडीतून निघाले धुराचे लोट...; खामगाव शेगाव रोडवरील घटना

By अनिल गवई | Updated: April 19, 2024 22:14 IST

खामगाव शहर अवघे पाच किलोमीटर दूर असतानाच गाडीतून धुराचे लोट निघाले. चालकाने प्रसंगावधान राखत, तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले अन्...

खामगाव : दुपारी ४ वाजता शेगाव येथून खासगी प्रवासी गाडी खामगावसाठी निघाली. खामगाव शहर अवघे पाच किलोमीटर दूर असतानाच गाडीतून धुराचे लोट निघाले. चालकाने प्रसंगावधान राखत, तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. गाडीतील प्रवासी लगेच गाडीबाहेर आले. गाडी काही केल्या बंद होईना. तितक्यात चालकाने इंजिन आणि रेडिएटरवर पाण्याचा मारा केला. त्यानंतर वाहनातून धुराचे लोट कमी झाले. गाडीही बंद झाली. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी एकादशी असल्यामुळे खामगाव येथून शेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. गुरुवारी आणि एकादशीला भाविकांची गर्दी जास्त असल्यामुळे भाविकांना खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. शुक्रवारीदेखील शेगाव येथून वाहन (एमएच-२८, एएन-१३०४) खचाखच प्रवासी घेऊन खामगावच्या दिशेने निघाले. खामगाव शहर काही अंतरावरच असताना एक महाविद्यालय आणि हनुमान मंदिराजवळ या गाडीतून वेगळाच आवाज निघत काळा धूर निघायला लागला. हा प्रकार गाडीतील महिला आणि प्रवाशांच्या निदर्शनास आला. त्यामुळे गाडीत एकच कल्लोळ उडाला.

या कल्लोळात प्रसंगावधान राखत चालकाने गाडी बाजूला घेऊन प्रवाशांना खाली उतरविले. गाडी बंद करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, गाडी बंद होत नसल्याने दुसरा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी चालकही वाहनाबाहेर पडला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीतून पाणी घेत, इंजिन आणि रेडिएटरवर पाण्याचा मारा केला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर काळ्या धुराचे लोट आणि गाडीचा आवाज बंद पडला. आग विझताच अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला, तर वाहनातील एका महिला प्रवाशाने दैव बलवत्तर म्हणून जीव वाचल्याचा अनुभव ‘लोकमत’कडे कथन केला. रस्त्याने जात असलेल्या वाहनातील काही प्रवासी आणि चालकही प्रसंगी धावून आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला -
प्रवासी वाहनात शेगाव येथून सुमारे १२ ते १४ प्रवासी बसले होते. यामध्ये काही महिलांचा आणि बालकांचाही समावेश होता. गाडीतून धुराचे लोट निघाल्यानंतर काहींनी जिवाच्या आकांताने बाहेर पडण्यासाठी खटाटोप केला.

टॅग्स :khamgaonखामगावcarकारfireआग