शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी व्यायाम शाळा प्रकरण; एलसीबीकडून पालिकेची झाडाझडती

By admin | Updated: May 2, 2017 19:19 IST

खामगाव: शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासोबतच स्थानिक पोलिसांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी खामगाव पालिकेत चौकशी करण्यात आली.

खामगाव: शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासोबतच स्थानिक पोलिसांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी खामगाव पालिकेत चौकशी करण्यात आली. मुख्याधिकारी रजेवर असल्याने, उपस्थित कर्मचाऱ्यांनी एलसीबी आणि स्थानिक पोलिसांना अपेक्षीत सहकार्य केले नसल्याचे समजते. खामगाव नगर पालिकेने २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत शिवाजी व्यायाम मंदिराच्या दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवत, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा यांच्या विरोधात ठराव पारीत केला आहे. या ठरावानुसार गुन्हा दाखल होण्याच्या आशंकेने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गेल्या गुरूवारी खामगाव न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला आहे. तथापि, गुन्हा दाखल नसतानाही सानंदांनी ४ मे पर्यंत जामीन मिळविल्याने, याप्रकरणी पालिका प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संतोष ताले यांनी पालिकेत धडक दिली. त्याचप्रमाणे याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एलसीबीचे निरिक्षक शिकरे यांनीही पालिकेत धडक दिल्याने, पालिकेत उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच धावाधाव झाली.मुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती, कर्मचाऱ्यांचे कानावर हात!खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे ७ मेपर्यंत दीर्घ रजेवर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी व्यायाम शाळा प्रकरणी चौकशीसाठी पालिकेत दाखल झालेल्या एलसीबी निरिक्षकांसह, शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या निरिक्षकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याची चर्चा आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांनी कानावर हात ठेवल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती.