शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

सट्टाबाजार संभ्रमावस्थेत

By admin | Updated: October 11, 2014 00:01 IST

बुलडाणा जिल्ह्यातील चित्र; विधानसभा आखाड्याचे भाव ठरविताना होते चाचपणी.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यातील राजकीय पक्षांसह उमेदवारांच्या वाढलेल्या संख्येमुळे प्रचाराचा जोरदार धुराळा उडत आहे. दररोज मतांचे गणित मांडून विजयाचे पारडे कमी-जास्त होत असल्याचे चित्र उभे केले जात आहे. त्यामुळे सट्टाबाजारातील उलाढालीवरही मतदारांचे लक्ष वेधले आहे. सट्टाबाजारात ज्या उमेदवाराचा भाव कमी, तो उमेदवार विजयाच्या दिशेने सरकत असल्याचा संकेत असतो. मात्र, सध्या या बाजारामध्येही संभ्रम व्यक्त केला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना या चार प्रमुख पक्षांसह मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव व मेहकर या विधानसभा मतदारसंघांमध्ये भारिप, तर बुलडाणा, सिंदखेडराजा व जळगाव जामोद या मतदारसंघांमध्ये मनसेचेही आव्हान मोठय़ा प्रमाणात मतविभाजन करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर संध्याकाळी व दुसर्‍या दिवशी भाजप उमेदवारांचे भाव कमी झाले होते; पुन्हा ते अनेक मतदारसंघांमध्ये वाढताना दिसत आहे. विजयाची हवा पाहून हे भाव ठरविले जात असून, त्यामध्ये दररोज होणारा चढउतार सट्टाबाजारातही संभ्रम निर्माण करणारा ठरला. अनेक बहाद्दरांनी पैसा लावल्याने ते बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.

*एकेका मतासाठी सुरू आहे शोधमोहीम

 उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे मतविभाजन मोठय़ा प्रमाणात होणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते कमी करण्याच्या प्रयत्नात आपल्या बाजूचेएक -एक मत महत्त्वाचे ठरणार असल्याची जाणीव उमेदवारांना झाल्यामुळे आता नातेवाईक, पाहुणे, मित्र आणि मित्राचा मित्र अशी नाती तसेच शत्रूच्या शत्रूचा शोध घेत मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड उमेदवारांतर्फे होत आहे. प्रत्यक्ष तसेच मोबाईलच्या माध्यमातून अशा मतदारांशी संपर्क साधून त्यात उमेदवारांची भूमिका समजून देण्यासह त्याला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

*मतांच्या विक्रीची भीती

 युती व आघाडी तुटल्यामुळे चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाल्याने एक, एक मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मतांच्या खरेदी-विक्रीसोबतच पोस्टल बॅलेटला किंमत मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निकालातील मतांचा फरक हा सात ते दहा हजारांच्या आत राहण्याची शक्यता असल्याने काही उमेदवारांनी शासकीय कर्मचार्‍यांचे पोस्टल बॅलेट विकत घेण्याच्या तयारी केली आहे. या प्रकाराची प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.