शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यात नारूसदृश जंतू

By admin | Updated: November 12, 2014 00:00 IST

मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात.

मेहकर (बुलडाणा): तालुक्यातील अंत्री देशमुख येथे पिण्याच्या पाण्यात नारूसदृश कृमी आढळून आला आहे. या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. याला दूषित पिण्याचे पाणी व घाणीचे साम्राज्य कारणीभूत आहे. तालुक्यातील अंत्री देशमुख व परिसरातसुद्धा अज्ञात तापाची साथ सुरू आहे; परंतु येथील पिण्याच्या पाण्यात अद्यापपर्यंत ब्लिचिंग पावडर किंवा पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी अशा कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. अंत्री देशमुख गावाला लागून असलेल्या नदीकाठावरील विहिरीतून या गावात पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी अंत्री देशमुख येथे पिण्याच्या पाण्याची टाकीही बांधण्यात आली आहे. या टाकीत साठवलेले पाणी संपूर्ण गावाला पुरविले जाते. सदर पिण्याच्या पाण्यात नारूसदृश कृमी आढळून आल्याने अंत्री देशमुखवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे वाढत असलेले साथीचे आजार व गावाला मिळणार्‍या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबरोबरच अंत्री देशमुख येथे घाणीचे साम्राज्यही मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाले आहे. गावात सर्वत्र घाण पसरली असताना ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन गावाला निर्जंंतुक पिण्याचे पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सोबतच यागोष्टीकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तत्काळ संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अंत्री देशमुख येथील ग्रामस्थांनी दिला.