शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार रस्सीखेच

By admin | Updated: October 16, 2014 00:36 IST

चिखली विधानसभा मतदारसंघात किरकोळ वाद वगळता, शांततेत मतदान.

चिखली (बुलडाणा) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये किरकोळ वाद वगळता, सर्वत्र शांततेत मतदान झाले. सकाळी ग्रामीण भागामध्ये तर शहरी भागामध्ये दुपारी ३ च्या नं तर मतदान प्रक्रियेने जोर धरला. सायंकाळी ५ वाजेपर्यंंत तालुक्यात सरासरी ४८.८७ टक्के एवढे मतदान झाले होते, तर सायंकाळी ६ वाजेपर्यंंत जवळपास ६७.६६ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागामध्ये खरीप पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असतानाही मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती. सकाळी मतदान केंद्रावर वाढलेल्या गर्दीमध्ये नवमतदारांचा अधिक भरणा दिसून आला. तरुण मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. चिखली मतदारसंघातील सावरगाव डुकरे येथे अनुराधा नगर परिसरामध्ये छात्रालयामध्ये वास्तव्याला असलेल्या विद्यार्थ्यांंच्या म तदानावरुन वाद निर्माण झाला होता, काहींनी या मतदारांवर आक्षेप घेतला होता; मात्र या विद्यार्थ्यांंची नावे मतदार यादीत असल्याने त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही, असे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगून हे प्रकरण निवळले. असाच प्रकार तालुक्यातील बोरगाव वसु येथील मतदान केंद्रावरही झाला.

चिखली मतदारसंघ

एकूण मतदान    २,६४,८६६

महिला             १,२५,७१५

पुरुष                १,३९,१५२

मतदान केंद्र                २७२