शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानापासून वंचित ठेवल्याची तक्रार

By admin | Updated: June 19, 2014 22:24 IST

सरपंच पदावरील अविश्‍वासावर घेण्यात निवडणुकीत ग्रा.पं.सदस्यांना मतदानापासून वंचीत ठेवल्याची तक्रार जिल्हाधिकारीकडे केली आहे.

मेहकर : तालुक्यातील पांगरखेड येथील सरपंच पदावरील अविश्‍वासावर घेण्यात निवडणुकीत ग्रा.पं.सदस्यांना मतदानापासून वंचीत ठेवल्याची तक्रार गजानन सवडतकर व नारायण सुर्वे यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पांगरखेड सरपंच कुंदा गणेश इंगळे यांच्या विरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव २ जून २0१४ रोजी तहसिलदार मेहकर यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तहसिलदारांनी अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा करण्याकरीता ७ जून रोजी ग्रा.पं.पांगरखेड येथे विशेष सभेचे आयोजन केले. सभेमध्ये गजानन तुकाराम सवडदकर व नारायण दिनकर सुर्वे यांना अप्पर जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी ग्रा.पं.सदस्य पदावरुन अपात्र केल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये, अशी लेखी हरकत सरपंच कुंदा इंगळे यांनी तहसिलदारांकडे दिली. त्यावरुन तहसिलदार यांनी गजानन सवडदकर व नारायण सुर्वे यांना विचारणा केली असता त्यांनी ग्रा.पं.सदस्य पदावर कायम असल्याचे सांगितले.
यासंदर्भात अमरावती आयुक्तांनी ग्रा.पं.सदस्यपद कायम असल्याचा निर्णय दिलेला असून, ग्रा.पं.च्या प्रत्येक बैठकीत सुमारे दिड वर्षापासून उपस्थित राहत असल्याचेही तहसिलदार यांना गजानन सवडदकर व नारायण सुर्वे यांनी सांगितले. परंतु सरपंच व तहसिलदार यांनी यासंदर्भात कुठलीच दखल न घेता गजानन सवडदकर व नारायण सुर्वे यांना मतदानापासून वंचीत ठेवले. त्यामुळे सरपंच कुंदा इंगळे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव पारित होऊ शकला नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी गजानन सवडदकर व नारायण सुर्वे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.