शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा भ्रम दूर करून उपाययोजना करा

By admin | Updated: November 22, 2014 01:09 IST

आमदार सपकाळांचे निर्देश: मुख्य कार्यपालन अधिका-यांशी चर्चा.

बुलडाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या डेंग्यूसदृश तापाच्या साथीबाबत प्रशासनाकडे असलेली आकडेवारी वेगळी आहे. हिवताप विभाग डेंग्यू नसल्याचे सांगते. खासगी दवाख्यान्यात डेंग्यूचे रुग्ण असल्याचे दाखले मिळतात त्यामुळे जनतेमधील संभ्रम दूर करून तापाचे निदान व्हावे तसेच तातडीने उपाययोजना करून जनतेला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने सत्वर कार्यवाही करावी, असे निर्देश आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिले. जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून तापाच्या साथीने डोके वर काढले आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची भेट घेतली. यावेळी जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुलोचना पाटील, समाजकल्याण सभापती गणेश बस्सी, जि.प. सदस्य अनिल खाकरे, अशोक पडघान, चित्रांगण खंडारे, शरद पाटील उपस्थित होते. आ. सपकाळ यांनी आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या आजार सा थीबाबत जनतेचे समाधान केल्या जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच आरोग्य यंत्रणोमध्ये निर्माण झालेल्या शिथिलतेबद्दल खेद व्यक्त केला. जर आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने डेंग्यूची लागण झालेली नाही तर सध्याची साथ ही कोणत्या ता पाची आहे, याबाबत तातडीने संशोधन व निदान करून योग्य त्या दिशेने रुग्णांवर औषधोपचार करण्याचे दिशानिर्देश आरोग्य यंत्रणेला देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.