शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही ‘डेथ सर्टिफिकेट’च्या संपेनात यातना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:00 IST

Buldhana News : मृत्यू प्रमाणपत्रावरील दुरूस्तीसाठी नातेवाईक कोविड सेंटरमध्ये गेल्यानंतर त्याठिकाणी दुरूस्ती करून दिली जात नाही.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर अनेक चुका होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मृतकाचे नाव, अडनाव किंवा इतर माहिती चुकीची भरल्यामुळे नातेवाईक अडचणीत सापडत आहेत. मृत्यू प्रमाणपत्रावरील दुरूस्तीसाठी नातेवाईक कोविड सेंटरमध्ये गेल्यानंतर त्याठिकाणी दुरूस्ती करून दिली जात नाही. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही डेथ सर्टिफिकेटच्या यातना येथे संपत नसल्याचे चित्र आहे.कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहर केला होता. दुसऱ्या लाटेने अनेकांना पोरके करून सोडले आहे. दोन महिन्यांपूर्वी कोविड सेंटरमध्येही जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर नातेवाईकही घाबरलेल्या अवस्थेत रुग्णाला कोविड सेंटरमध्ये भरती करत होते. रुग्णाला भरती करत असताना त्याची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. परंतु रुग्णांच्या नावात चुका झाल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्या प्रमाणपत्रावरील माहिती चुकीची झाल्याने प्रमाणपत्रावरील दुरूस्तीसाठी नातेवाईकांचा खटाटोप सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता नातेवाईक आपल्या रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेऊन कोविड सेंटरमध्ये चूक दुरूस्तीसाठी जात आहेत. परंतु कोविड सेंटरमधील अधिकारी व कर्मचारी हे काम आमचे नाही, म्हणून त्या नातेवाईकांना परत पाठवतात. 

चूक कुणाची आणि हेलपाटे कुणाला?नातेवाईक तर आपल्या रुग्णाचे नाव चुकीचे सांगू शकत नाहीत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला कोविड सेंटरमध्ये भरती करताना किंवा त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांचे नातेवाईक भांबावलेल्या परिस्थितीत असतात. अशावेळी कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णाची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. मग या प्रकारामध्ये चूक कुणाची आणि हेलपाटे कुणाला? असा प्रश्न नातेवाईकांमधून उपस्थित होत आहे. 

आमच्या घरातील मोठा आधार गेला आहे. आता मला मत्यूचे प्रमाणपत्र शैक्षणिक कामासाठी आवश्यक आहे. परंतु त्यावर नावात चुका झालेल्या आहेत. त्या कोविड सेंटरमधून दुरूस्त करून मिळत नाहीत. - मृतकाचे नातेवाईक. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या