शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदी पात्रात अधिकाऱ्यांची धडक

By admin | Updated: May 31, 2017 00:27 IST

अवैध रेती उपसा करणाऱ्यांचे साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : २९ मे रोजी सायंकाळी काळेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रात महसुल विभागाच्यावतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडक दिली .उपसा करणाऱ्यांनी पळ काढल्यामुळे अधिकाऱ्यांनी अवैध रेती ऊपसा करणारे साहित्य जप्त करीत सदर साहित्य शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. ही कार्यवाही सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालली. काळेगाव शिवारात पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याची बाब तलाठी व मंडळ अधिकारी यांनी प्रशासनाला कळविली. त्यावरून नायब तहसिलदार हेमंत पाटील, मंडळ अधिकारी पी.के.पाटील, तलाठी उगले हे पोलीस पथकासह नदीपात्रात धडकले. दरम्यान उपसा करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पंपींग मशीन, डिझेल टाक्या, लोखंडी टाक्या, फावडे, कुदळ आदी साहित्य ताब्यात घेवून शहर पोलीस स्टेशनला जमा केले. तत्पुर्वी या अधिकाऱ्यांची वाट अडविण्याचा प्रयत्नही काही अज्ञात लोकांकडून करण्यात आला. रात्रीच्या या प्रकारामुळे महसुल विभाग व रेती माफीयांमध्ये संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान परतीच्या मार्गावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या वाटा अडविण्याचा प्रयत्नही वाटेत घडला.या प्रकारामुळे आता महसुल विभाग व रेती माफीयांमध्ये संघर्ष उभा ठाकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.