शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचा पदाधिका-यांनी घेतला आढावा

By admin | Updated: November 29, 2014 22:48 IST

चिखली तालुक्यातील प्रकार; तक्रारीत अन् पोषण आहारातही आढळले तथ्य.

चिखली (बुलडाणा): तालुक्यातील अंगणवाडी केंद्रातील बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्या जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर आणि महिला व बालकल्याण सभापती आशाताई झोरे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे कुपोषण होऊ नये आणि त्यांना सकस आहार मिळावा सोबतच त्यांच्यात शाळा आणि शिक्षणाबद्दलची गोडी वाढीस लागावी या उदात्त हेतूने शासनाने महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू केलेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना द्यावयाच्या सकस आहाराचा दर्जा हा चिंतेचा विषय ठरला आहे. शनिवार २९ नोव्हेंबर रोजी याबाबत लोकमतने आवाज उठविल्याबरोबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर आणि महिला व बालकल्याण सभापती आशाताई झोरे यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला पत्रकारांसह भेट देऊन तक्रारीची पडताळणी केली. या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने तालुक्यातील भरोसा येथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पोषण आहारातील प्रमुख कडधान्याची पाहणी केली असता हरभरा, चवळी यांना मोठय़ा प्रमाणात कीड लागलेली आढळून आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व महिला बालकल्याण विभागाच्या सभापती यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची पडताळणी केल्यानंतर कदाचित थातूरमातूर कारवाई करून कनिष्ठ पातळीवरील कर्मचार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यातही येईल. मात्र, या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची धमक जिल्हा परिषद आणि शासनातील पदाधिकारी दाखवतील काय, असा खरा प्रश्न आहे.