निगरुण पादुका महोत्सवाचा समारोप

By Admin | Updated: December 20, 2014 00:10 IST2014-12-20T00:10:34+5:302014-12-20T00:10:34+5:30

दत्त दिगंबराच्या जयघोषात खामगाव नगरी दुमदुमली.

Nigrum Padukka Festival concludes | निगरुण पादुका महोत्सवाचा समारोप

निगरुण पादुका महोत्सवाचा समारोप

खामगाव (बुलडाणा): दिगंबरा..दिगंबरा श्रीपाद् वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्री मुक्तेश्‍वर आश्रमात सुरू असलेल्या श्री निगरुण पादुका महोत्सवाचा आज शुक्रवारी समारोप झाला. दुपारी ४ वाजता श्री मुक् तेश्‍वर व पू.संचारेश्‍वर माउलींची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत सुरुवातीला बाल वारकरी दीडपावल्या खेळत होते. त्यानंतर पितांबरधारी ब्रम्हवृंद तसेच मुक्तेश्‍वर माउलीचे राज्यभरातून आलेले भाविक सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या शेवटी सजविलेल्या रथावर श्री मुक्तेश्‍वर आणि पू. संचारेश्‍वर माउलींची मूर्ती होती. श्री मुक्तेश्‍वर आश्रमातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा पुन्हा मुक्तेश्‍वर आश्रमात पोहोचली. सायंकाळी ७ वाजता प.पू.दिढे मामा यांच्या हस्ते आरती उपासना झाली. त्यानंतर या पालखी महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

Web Title: Nigrum Padukka Festival concludes