शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सोनाळा, बिबी येथे नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी

By admin | Updated: October 13, 2015 23:43 IST

बुलडाणा जिल्ह्यातील दोन प्रस्तावित पोलीस स्टेशनला शासनाची मंजुरी; पोलीस स्टेशनची संख्या पोहचली ३३ वर.

बुलडाणा: वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेमुळे व कमी पोलीस संख्येमुळे पोलीस प्रशासनाला अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता, जिल्ह्यातील प्रस्तावित दोन नवीन पोलीस स्टेशनला राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यात सोनाळा आणि बिबी येथील पोलीस स्टेशनचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात ३१ पोलीस स्टेशन आहे. शिवाय दोन नवीन मंजूर झाल्यामुळे ही संख्या ३३ वर पोहचली. लोणार पोलीस स्टेशनचे विभाजन करून बिवी तसेच तामगाव स्टेशनचे विभाजन करून सोनाळा असे दोन पोलीस स्टेशन तयार करण्याचा प्रस्ताव बुलडाणा पोलीस प्रशासनाकडून राज्य शासनाच्या गृहविभागाकडे पाठविण्यात आला होता. संग्रामपूर येथील आदिवासीबहुल आणि अतिदुर्गम तालुक्यात तामगाव हे एकमात्र पोलीस स्टेशन होते. तसेच जगप्रसिद्ध खार्‍या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार पोलीस स्टेशनवरही पूर्ण तालुक्याची जबाबदारी होती. या दोन्ही पोलीस स्टेशनवरील वाढत्या लोकसंख्येचा भार लक्षात घेता, सोनाळा व बिबी अशा दोन पोलीस स्टेशनला मंजुरात देण्यात आली. सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत २५ गावांचा समावेश करण्यात आला असून, सोनाळा, बावनबीर, लाडणापूर, वसाळी बु., अंबाबारवा, हडयामाल, चिंचारी, निमखेडी, चुनखेडी, गुमठी, शेंभा, साळवन, पिंप्री, पिंप्री बु., वानपुर, टुनकी बु., टुनकी खु., रोहन खिडकी, बोरखेड, बल्हाड, वानखेड, साईखेड, सगोळा, आलेवाडी, पलसोडा आणि संग्रामपूर उजाड येईल. बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत २३ गावांचा समावेश करण्यात आला असून, बिबी, कोनाटी, खंडाळा, झोटिंगा, पिंप्री खंदारे, महारचिकना, सावरगाव वेली, खारखेड लाड, किनगाव जट्ट, खडेगाव, चोरपांग्रा, मांडवा, देऊलगाव कोल, ब्राह्मण चिकना, हिवरखेड, वसंतनगर, कुंबेफळ, खापरखेड घुले, चिखला काकड, गोवर्धन नगर, भुमराला, वर्दली खु. आणि देवा नगर समावेश आहे. जागेसाठी शोध सुरूराज्य शासनाद्वारा सोनाळा व बिबी येथे नवीन पोलीस स्टेशन मंजुरात मिळाल्यानंतर बुलडाणा पोलीस प्रशासनाकडून दोन स्टेशनसाठी अस्थाई स्वरूपात खासगी इमारतीच्या जागेसाठी शोध सुरू आहे. सोबतच या स्टेशनमध्ये किती अधिकारी व कर्मचार्‍यांची आवश्यता आहे, हे अजून निश्‍चित होणे बाकी आहे.