शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन हरबरा येताच पडले भाव !

By admin | Updated: March 20, 2017 02:01 IST

शेतक-यांना आर्थिक फटका; तीन महिन्यात तीन हजाराने घसरले दर.

बुलडाणा, दि. १९- बाजारात नवीन हरबरा येताच हरबर्‍याचे भाव कमी झाले आहेत. गत तीन महिन्यात तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने हरबर्‍याचे दर घसरले असून, सध्या ४ हजार रुपयापर्यंतच हरबर्‍याला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे. पावसाळा चांगला झाल्याने यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी जमीनीत चांगला ओलावा होता. त्यामुळे यावर्षी हरबरा पीक चांगले आले. सध्या हरबरा काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकर्‍यांना एकरी जवळपास ८ ते १0 क्विंटलपर्यंंत हरबरा उत्पादन होत आहे. तसेच मागील वर्षी हरभर्‍याला सरासरी १0 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होता. त्यामुळे यावर्षी सहाजीकच हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले. तसेच जमीनीतील ओलावा, गेल्यावर्षी हरबर्‍याला मिळालेले चांगले दर व सिंचनाची सुविधा असलेल्या बहुतांश शेतकर्‍यांनी यावर्षी हरबर्‍याचे उत्पादन घेतले. मात्र शेतकर्‍यांच्या घरात हरभर्‍याचे पीक येण्याअगोदर फेब्रुवारी महिन्यातच हरबर्‍याचे दर घसरले. आता नवीन हरबरा बाजारामध्ये येताच त्यात आणखी घसरण झाली आहे. २0१६ मध्ये सुरूवातीला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभर्‍याला ९ हजार ५00 ते ११ हजार ६00 रुपये भाव होता. तर डिसेंबरमध्ये ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव होता; मात्र गेल्या तीन महिन्यात ३ हजार रुपयांने प्रतिक्विंटल हरबर्‍याचे भाव पडले आहेत. सध्या हरबर्‍याचे उत्पादन वाढले असल्याने केवळ ४ ते ४ हजार ५00 रुपयांपर्यंंत हरबर्‍याला प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत. उत्पादन येताच हरबर्‍याचे भाव घसरल्याने हरबरा उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. तूरीपाठोपाठ हरबर्‍यालाही फटका!काही दिवसांपासून जिल्ह्यात तूर खरेदीचा खेळखंडोबा सुरू आहे. नाफेडकडून शेतकर्‍यांच्या तूर खरेदीस टाळाटाळ सुरू असून, शासनाने दिलेल्या हमीभावात तूर विक्री करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपडत सुरू आहे. तूरीपाठोपाठ आता हरबर्‍यालाही फटका बसत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तूर व हरभर्‍याच्या भावात हजारो रुपयांपेक्षाही घसरण आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.