विवाहीत महिलेची तीन वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:10 IST2020-10-23T15:10:29+5:302020-10-23T15:10:37+5:30

रुपाली जायभाये व तिची तीन वर्षाची मुलगी ईश्वरी हिला सोबत घेवून घराबाहेर  गेली होती.

Married woman commits suicide with three-year-old daughter | विवाहीत महिलेची तीन वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

विवाहीत महिलेची तीन वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

साखरखेर्डा: भल्या पहाटेच घरातून आपल्या तीन वर्षीय चिमुकल्या मुलीसह बाहेर पडलेल्या २४ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह तालुक्यातील कंडारी येथे २१ ऑक्टोबर रोजी दुपारी आढळून आला. दरम्यान, चिमुकल्या मुलीच मृतदेही २२ ऑक्टोबर रोजी त्याच विहीरीत आढळून आला.
कंडारी येथील गैबीनाथ नारायण जायभाये हे वाहनचालक पत्नी रुपाली व मुलगी ईश्वरीसह देऊळगावराजा येथे राहत होते. मात्र कोरोना संसर्गामुळे ते आपल्या मूळ गावी कंडारी येथे परतले होते.  २१ आ१क्क्टोबर रोजी पहाटे तीन वाजेचच्या सुमारास रुपाली जायभाये व तिची तीन वर्षाची मुलगी ईश्वरी हिला सोबत घेवून घराबाहेर  गेली होती. दिवस उजाडला तरी ती परत आली नव्हती. 
त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता घराच्या मागील शेतात या महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र तीन वर्षाची मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे रात्रभर विहीरीचे पाणी उपसण्यात आल्यानंतर २२ ऑक्टोबरला सकाळी चार वाजता चिमुकल्या ईश्वरीचेही पार्थिव सापडले. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचा पुढील तपास साखरखेर्डा पोलिस करीत आहेत.

Web Title: Married woman commits suicide with three-year-old daughter