शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 2:12 PM

हा अपघात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मेरा खुर्द फाट्याजीक घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा: भरधाव वेगात खासगी प्रवासी बस चालवून दुचाकीस्वारास धडक देत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी अकोला येथील एमएच-१२-एनबी-५५०५ क्रमांकाच्या बसच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मेरा खुर्द फाट्याजीक घडला.या अपघातामध्ये दुचाकीवरील (क्र. एमएच-२८-झेड-४१०३) नागेश राजाराम भवरे (३५, रा. मकरध्वज खंडाळा) हा व्यक्ती ठार झाला आहे. २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अंढेरा पोलिस ठाण्यातील एएसआय सुरेंद्र शेळके व एसएसआय बरडे हे रात्र गस्तीवर होते. दरम्यान २५ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास मेरा खुर्द फाट्यानजीक अपघात झाल्याची माहिती त्यांना अंढेरा पोलिस ठाण्यातून मिळाली. त्या आधारावर दोघेही मेरा खुर्द येथे पेट्रोल पंपानजीक अपघास्थळी पोहोचेल असता एमएच-१२-एबी-५५०५ क्रमांकाच्या खासगी प्रवासी बसने दुचाकीस्वार नागेश राजाराम भवरे यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सोबतच दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणी घटनास्थळाचा पंचानामा करून त्यांनी लगोलग मृत नागेश राजाराम भवरे यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.या प्रकरणी खासगी प्रवासी बस चालक रविंद्र गजानन लोखंडे (३२, रा. खडकी, अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात