शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:11 IST

भाजपचे आकाश फुंडकर, काँग्रेसचे ज्ञानेश्वरदादा पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारातच सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या खामगाव विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.खामगाव या मतदारसंघात भाजप-सेना महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्येच तिहेरी सामना रंगणार असल्याचे शुक्रवारी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावरून दिसून येते. खामगाव मतदारसंघात शुक्रवारपर्यंत १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजपचे आकाश फुंडकर, काँग्रेसचे ज्ञानेश्वरदादा पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारातच सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून दाखल उमेदवारी सद्यस्थितीत कायम असली तरी, स्वाभीमानी शेतकरी संघटना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत या मतदारसंघातून स्वाभीमानीचे आव्हान संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे. वंचित आघाडीकडून दोन उमेदवारांनी एकाचवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, वंचितच्या उमेदवारीबाबत काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र आहे. या मतदारसंघातून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराने गुरूवारी अर्ज दाखल केल्यानंतर, शुक्रवारी दुसºया एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवारीतही अर्ज दाखल होईपर्यंत सस्पेन्स कायम असल्याचे दिसून येते.

एआयएमआयएमचा उमेदवार रिंंगणात नाही?खामगाव मतदारसंघातून एआयएमआयच्यावतीने एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे. एआयएमआयची वंचित सोबत युती नसतानाही या मतदारसंघातून एआयएमआयने उमेदवार न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :khamgaon-acखमगावMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019