सिंदखेडराजा येथे एक लाखाची घरफोडी

By Admin | Updated: May 29, 2014 00:50 IST2014-05-29T00:36:06+5:302014-05-29T00:50:57+5:30

अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २७ मे रोजीच्या रात्रीतून घडली.

A lacquer burglar at Sindhkhedraja | सिंदखेडराजा येथे एक लाखाची घरफोडी

सिंदखेडराजा येथे एक लाखाची घरफोडी

सिंदखेडराजा : येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २७ मे रोजीच्या रात्रीतून घडली. सिंदखेडराजा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खेकाळे यांचे घरी २७ मे रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे दार उघडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व जण झोपेत असताना लोखंडी व लाकडी कपाट उघडले व त्यातील अंदाजे दोन तोळे सोने ५६ हजार, ७00 ग्रॅम चांदी २८ हजार व १५ हजारांची रोकड तसेच इतर मौल्यवान वस्तुंसह नवीन कपडे अशी एकूण एक लाखाची चोरी करुन चोरटे पसार झाले असल्याची माहिती अतुल खेकाळे यांनी दिली. रात्री ३ वाजता दरम्यान अतुल खेकाळे यांना जाग आली तेव्हा घराचे सर्व दरवाजे उघडे, कपाट उघडे व कपडे अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून चोरी झाल्याची जाणीव होताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अध्र्या तासाने पोलिस घटनास्थळावर येऊन पाहणी केली. घरामध्ये खेकाळे यांची सासू, सासरे झोपलेले होते. सासुच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी चोरुन नेले.

Web Title: A lacquer burglar at Sindhkhedraja