शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव :  स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले परराज्यातील नऊ जण ‘क्वारंटीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 11:53 IST

तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे स्थलांतर करणाऱ्या ९ जणांना येथील बाळापूर नाक्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना विषाणुला रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. दरम्यान, स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले परराज्यातील नऊ जण खामगाव शहरात क्वारंटीन करण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे बाहेर राज्यातील कामगार वर्गही मोठा प्रभावित झाला असून काम नसल्याने सर्व आपल्या राज्यात स्थलांतर करीत आहेत. खामगाव शहरातून स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले ९ युवकांना १४ दिवसांसाठी क्वारंटीन करण्यात आले आहे. कोव्हीड- १९ च्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण देश लॉकडाऊन असताना अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने मजुर आणि कामगार वर्ग स्थलांतरण करीत असल्याने प्रशासनासमोर या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ज्या ठिकाणी मजूर स्थलांतरीत करतांना मिळून येईल त्यांना तेथेच डिटेन करून १४ दिवसांसाठी क्वॉरंटीन करावे तसेच त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मंगळवारी जळगाव खान्देश येथून तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे स्थलांतर करणाऱ्या ९ जणांना येथील बाळापूर नाक्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांचेकडून या युवकांमध्ये सोशल डिस्टन्सींग ठेवण्यात आले आहे.सर्व युवकांना येथील महसुल विभागाच्या ताब्यात देवून त्यांची राहण्याची आणि जेवणाची तसेच आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणेदार अंबुलकर यांनी दिली.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार