शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटीच्या अनुदानातून केली परस्पर कपात

By admin | Updated: June 18, 2014 00:39 IST

शाखा व्यवस्थापक व तलाठय़ाविरुध्द गुन्हा

अमडापूर : शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या गारपिटीच्या अनुदानातून प्रति शेतकरी १00 रुपयांची परस्पर कपात केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अमडापूर पोलिसांनी स्थानिक जगदंबा पतसंस्थेचे शाखाधिकारी व तलाठय़ाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अमडापूर व परिसरात गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे रब्बी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तलाठी तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर या शेतकर्‍यांना दिलासा म्हणून शासनाकडूनआपदग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार परिसरातील शेतकर्‍यांना अमडापूर येथील जगदंबा पतसंस्था बिगर कृषी पतसंस्थेव्दारे अनुदान वितरीत करण्यात येणार होते. त्यानुसार लाभार्थी शेतकर्‍यांच्या याद्या व रक्कम या पतसंस्थेकडे पाठविण्यात आली होती. शेतकर्‍यांना शासनाकडून जाहीर झालेल्या अनुदानातून कोणत्याही प्रकारची रक्कम कपात करु नये असे आदेश असताना सुध्दा एकनाथ गणपत काळे, व्यवस्थापक जगदंबा पतसंस्था अमडापूर यांनी आपदग्रस्त शेतकर्‍यांच्या अनुदानातून प्रत्येकी १00 रु. प्रमाणे कपात करुन शासनाची व शेतकर्‍यांची फसवणूक केली व यासाठी तलाठी रियाज शेख भाग नं.३ अमडापूर याने याकामी मदत केली. याबाबतची तक्रार तहसिलदार राजेश्‍वर वासुदेवराव हांडे वय ४१ चिखली यांनी आज १७ जून रोजी अमडापूर पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी एकनाथ गणपत काळे, व्यवस्थापक जगदंबा पतसंस्था अमडापूर व तलाठी रियाज शेख भाग नं. ३ अमडापूर यांचेविरुध्द कलम ४२0,५00,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार निशांत मेश्राम करीत आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.