शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भारतीय खाद्य निगमच्या गोदामावरील भुईकाटा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 17:45 IST

एफसीआय अधिकाºयांनी गोदामावरील भुईकाटा बंद करून खासगी भुईकाट्यावरून  गोरगरीबांसाठी भरून जाणाºया धान्याचे वजन करण्याची  परवानगी वरिष्ठांकडे मागितली आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय)च्या इलेक्ट्रानिक भुई काट्यातील फेरफार प्रकरणाचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केला. त्यानंतर अडचणीत सापडलेल्या एफसीआय अधिकाºयांनी गोदामावरील भुईकाटा बंद करून खासगी भुईकाट्यावरून  गोरगरीबांसाठी भरून जाणाºया धान्याचे वजन करण्याची  परवानगी वरिष्ठांकडे मागितली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.भारतीय खाद्य निगमच्या टेंभूर्णा येथील गोदामावरील भुईकाट्यात ब्लॅक स्टोन लॉजीस्टिक कंपनीने फेरफार केली.  भुई काट्याचे इंडिकेटर विनापरवानगी बदलविण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतीय वैद्यमापन विभागाने काटा जप्त केला. त्यानंतर संबंधितांना २८ हजाराचा दंड ठोठावला. काट्यावर अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्याने या काट्याचे प्रमाणिकरण विलंबाने करण्यात आले. दरम्यान, प्रमाणीकरण झाल्यानंतरही भुई काट्यावरील वजन आणि शहरातील इतर खासगी काट्यावरील वजनात तफावत आढळून आल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर भारतीय खाद्य निगमच्या साठा अधिक्षकांनी मंडळ प्रंबधकांना पत्र देत, खासगी भुईकाट्यावरून जावक  परवानगी देण्याची मागणी केली आहे. साठा अधिक्षकांच्या पत्रातील कारण संशयास्पद!एफसीआयचे साठा अधिक्षक बी.एफ.भवर यांनी मंडळ प्रबंधकांना दिलेल्या पत्रात ३१ मे २०२० रोजी वादळी वारे तसेच वीज चमकणे आणि पावसामुळे वजन काट्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, तत्पूर्वी म्हणजेच ३० मे रोजी‘प्रमाणीकरणानंतरही एफसीआयच्या भुई काट्यातील ‘तूट’ कायम’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत करून काट्यावरील पोलखोल उघडकीस आणली होती. त्यानंतर साठा अधिक्षकांकडून पत्र देत, वरिष्ठांची दिशाभूल करण्यात आली. परिणामी, वजन काट्यातील फेरफार प्रकरणात एफसीआयचे स्थानिक अधिकारी तर सहभागी नाही ना? अशी जोरदार चर्चा आहे.

 धान्याची रॅक संपल्यानंतर काटा खराब!भारतीय खाद्य निगमकडून रेल्वेद्वारे (रॅकने) धान्य पाठविण्यात येते. खामगाव येथील धान्याची रॅक संपल्यानंतरच गोदामावरील काटा खराब झाल्याने, गोदाम व्यवस्थापन आणि ब्लॅक स्टोन व्यवस्थापनावर संशयाची सुई बळावत असल्याची जोरदार चर्चा आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा