हुंडाबळीप्रकरणी आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी

By Admin | Updated: August 26, 2015 00:30 IST2015-08-26T00:30:20+5:302015-08-26T00:30:20+5:30

बुलडाणा येथील हुंडाबळीप्रकरण.

Five-day police custody of accused in Dundee case | हुंडाबळीप्रकरणी आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी

हुंडाबळीप्रकरणी आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी

बुलडाणा : येथील प्रणिता सचिन भारुका या डॉक्टर महिलेने सासरकडून हुंड्यासाठी होणार्‍या छळाला कंटाळून १४ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी पती आरोपी डॉ.सचिन भारुका याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. २५ ऑगस्टला पुन्हा न्यायालयात हजर केले असताना आरोपीला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील इतर आरोपी सासू लीलाबाई ओमप्रकाश भारुका, जेठ गोपाल ओमप्रकाश भारुका, जेठानी श्रद्धा भारुका अद्यापही फरार असून, पोलीस तिघांचाही शोध घेत आहे.

Web Title: Five-day police custody of accused in Dundee case