शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्याच खात्यात रक्कम जमा करणार

By admin | Updated: May 2, 2017 19:07 IST

मेहकर- येथील तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे तहसिलदार संतोष काकडे यांनी सांगितले.

दोन दिवसात तूर खरेदी केंद्र सुरु होईल - तहसिलदार काकडेमेहकर : नाफेड मार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने तसेच तुरीचा बारदाना नसल्याने मेहकर येथील तूर खरेदी केंद्र काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकरी परेशान झाले आहेत. दरम्यान येत्या दोन दिवसात मेहकर येथील तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे तहसिलदार संतोष काकडे यांनी सांगितले. १ मे रोजी नाफेड अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ व महसूल अधिकारी यांची तहसिल कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी तहसिलदार संतोष काकडे संबंधित अधिकाऱ्यांना सुचना करीत होते. शेतकऱ्यांची खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने तसेच बारदाना नसल्याने गेल्या काही दिवसापासून तूर खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे शेतकरी परेशान झाले आहेत. जवळपास १९ हजार क्विंटल तूरीचे मोजमाप करणे अजूनही बाकी आहे. तर खरेदी केलेली तूर ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात उघड्यावर ठेवण्यात आली आहे. तूर खरेदी केंद्र लवकर सुरु व्हावे, यासाठी सर्व स्तरातून मागणी होत आहे. मेहकर येथील खरेदी केलेली तूर आज व उद्या उचलून खामगाव येथे साठविण्यात यावी, तसेच उर्वरीत तूर खरेदी करुन त्याचे तात्काळ मोजमाप करावे, अशा सुचना तहसिलदार काकडे यांनी यावेळी दिल्या.