शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदानात महिलांचा टक्का वाढला!

By admin | Updated: June 10, 2015 02:41 IST

दिन विशेष ; १५0 महिलांचा नेत्रदानाचा संकल्प.

अनुराधा जाधव / बुलडाणा : 'डोळे हे मनाचा आरसा' असे म्हटले जाते. या उक्तीप्रमाणे डोळे आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग असून, डोळे नसतील तर आयुष्यच बेरंग होऊन जाते. नेत्रदानाचे महत्त्व जाणून जिल्ह्यातील १५0 जागृत महिलांनी आपल्यानंतर हे सुंदर जग दुसर्‍या कुणाला स्वत:च्या डोळय़ाने पाहता यावे याकरिता नेत्रदान करण्याचा संकल्प करून सामाजिक दायित्व जोपासले आहे. नेत्रदानासाठी संपूर्ण भारतात मोहीम राबविली जात असताना अनेक सामाजिक संस्थासुद्धा शिबिरांच्या माध्यमातून याविषयी प्रबोधन करताना आढळून येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात गत वर्षभरात जवळपास ६५0 स्त्री व पुरुषांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. यामध्ये १५0 स्त्रिया आणि ५00 पुरुषांनी आपली नावे नोंदविली. इतर अवयव दान करण्याबरोबरच नेत्रदानामुळे आपले डोळे आपल्या मृत्यूनंतर गरजू व्यक्तीच्या कामी येईल. या भावनेतून नेत्रदानाचा संकल्प केल्यानंतर जिल्ह्यातील लोकांमध्ये जनजागृती होताना दिसत आहे. मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी १८ ते ४0 वयोगटातील कोणतीही व्यक्ती संकल्पपत्र भरून आपली इच्छा पूर्ण करू शकतो. अशी व्यक्ती अपघातात किंवा नैसर्गिकरीत्या मरण पावली असता त्या व्यक्तीचे डोळे सहा तासाच्या आत काढल्यास त्याचा उपयोग दृष्टिहीन व्यक्तीला होतो. डोळ्याचे रोपन करण्याआधी त्याच्या आजाराची योग्य ती तपासणी करण्यात येऊन डोळय़ाची अवस्था निरोगी आढळून आली तरच ते रोपन केल्या जाते. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही या माहिमेची जागृती होणे आवश्यक असून, सामाजिक संस्थेबरोबरच आरोग्य विभागानेही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागात नेत्रदात्याचे प्रमाण कमी असण्याचे कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली अंधश्रद्धा व नेत्रदानाविषयी असलेले अज्ञान, पुनर्जन्मावर असलेला ठाम विश्‍वास यामुळे ते लोक नेत्रदान करण्यास धजावत नाहीत. नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान कसे आहे, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.