उत्कृष्ट मूर्तिकार आठवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

By Admin | Updated: April 25, 2017 20:03 IST2017-04-25T20:03:14+5:302017-04-25T20:03:14+5:30

देऊळगावराजा : मूर्तिकार योगेश आठवे यांना मुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्याच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.

Excellent sculptor eighth award at the hands of Chief Minister | उत्कृष्ट मूर्तिकार आठवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

उत्कृष्ट मूर्तिकार आठवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

देऊळगावराजा : राज्यस्तरीय उत्कृष्ट पर्यावरणपूरक मूर्तिकार पुरस्कारासाठी मुर्तीकार योगेश आठवे यांची निवड झाली असून, त्यांना मुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्याच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारने मुंबई येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.
लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी दिलेल्या "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त सर्वाजनिक लोकमान्य गणेशोत्सव अभियांनार्तगत गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन तालुका, जिल्हा, आणि विभागीय स्तरावर करण्यात आले होते. मूर्तीकारांचा पारितोषीक वितरण समारंभ मुुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, संजय पाटील तथा मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. बुलडाणा जिल्हास्तरीय गणेशोत्सव मुर्तीकार प्रा.योगेश आठवे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषीक घोषीत करण्यात आले आणि त्याना सन्मानपत्र ३० हजार रूपयेचे धनादेश प्रदान करण्यात आले.

Web Title: Excellent sculptor eighth award at the hands of Chief Minister