अपंगांचा थाळीनाद

By Admin | Updated: July 20, 2015 23:55 IST2015-07-20T23:22:09+5:302015-07-20T23:55:42+5:30

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंगाचे आंदोलन.

Disability Thalanad | अपंगांचा थाळीनाद

अपंगांचा थाळीनाद

बुलडाणा : अपंगांची होत असलेली हेळसांड थांबवावी, या मागणीसाठी अपंगांच्या विविध मागण्यांसाठी अपंग लोक कल्याण संघटनेच्यावतीने आज २0 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे थाळीनांद आंदोलन करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात कायमस्वरुपी शासकीय सेवेतील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त करावा, अपंगांसाठी अपंग तपासणी बोर्ड व ओ.पी.डी दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावी, जि.प.च्या सेस फंडांतर्गत तीन टक्के आर्थिक निधी अपंगांच्या पुनर्वसनासाठी खर्च करण्यात यावा, अपंगांना शेवाई मशीन, दालमिल, पापड मशीन, झेरॉक्स मशीन, संगणक संच, शिलाई मशीन, पीठाची गिरणी आदी देण्यात यावे, अपंगांच्या मुलांना सरळ सेवेने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, बीज भांडवल कर्जाची सबसिडी त्वरित देण्यात यावी, संघटनेच्या अपंग पदाधिकार्‍यांना शासकीय समित्या व मंडळावरती सदस्य घेण्यात यावे, निराधाराचे प्रकरण त्वरित मंजूर करण्यात यावे, अपंगांना दारिद्रय़ रेषेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अपंगांना सर्वस्तरावर तीन टक्के आरक्षण देण्यात यावे. आदी मागण्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत. आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव डोंगरदिवे, डॉ.वि.एम. खरात, प्रकाश मांजरे, प्रभाताई मोरे, विजय रायपुरे,आदी सहभागी झाले होते.

Web Title: Disability Thalanad