शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

धाड ( बुलडाणा )येथे डायरियाचे ४00 रूग्ण

By admin | Updated: June 19, 2014 22:09 IST

वैद्यकीय अधीक्षक निलंबित

धाड : बुलडाणा तालुक्यातील धाडमध्ये काल सायंकाळपासून डायरियाची लागण झाल्याने जवळपास ४00 नागरिकांना बाधा झाली, त्यापैकी १५0 च्यावर रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून, इतर खासगी रुग्णालयात २५0 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून वैद्यकीय अधीक्षक डॉ.गवई हजर नसल्याने येथे केवळ एक वैद्यकीय अधिकारी, एक युनानी डॉक्टर, एक परिचारिका असे तीनच कर्मचारी रुग्णालयाचा कारभार पाहत आहेत. अचानक डायरियाची लागण झाल्याने रुग्णांना सेवा देण्यात रूग्णालय व्यवस्थेची तारांबळ उडाली. या रुग्णालयात केवळ ३0 खाटांची क्षमता असताना एका खाटेवर तीन-तीन रुग्ण भरती करुन त्यांना उपचार देण्यात येत आहे. आज रूग्णांची वाढती संख्या पाहता कंत्राटी वाहनचालक, शिपाई, कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी रुग्णांना सलाईन लावले.
यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ.साबीर खान यांनी सांगितले की, सदरची लागण ही दूषित पाण्याचे पिण्यामुळे झाली असून, हा ह्यकॉलराह्ण आहे किंवा दुसरा कोणता, हे अजून निष्पन्न नाही. रुग्णसंख्येत वाढ झाल्यास रुग्णांना बुलडाणा हलवावे लागेल. तर औषध निर्माता दत्ता शेवाळे यांनी सांगितले की, याठिकाणी आवश्यक औषधसाठा उपलब्ध असून, फक्त कर्मचारी हजर नसल्याने रुग्णांना तत्काळ सेवा देणे कठीण जात आहे. दुपारपर्यंत येथील रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढून ३00 च्या वर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या रुग्णालयात प्रा.आर. केंद्र चांडोळ येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यांनी हजर होऊन रुग्णांवर उपचार सुरू केले तर हतेडी, बुलडाणा येथूनही काही डॉक्टर व कर्मचारी वर्ग हजर झाला होता. तर रूग्णांच्या मदतीसाठी त्यांचे नातेवाईक हजर झाले आहेत.

** वैद्यकीय अधीक्षक निलंबित
धाड ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही सुविधा नसल्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी रुग्णालयातच ठिय्या आंदोलन केल्यामुळे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवई यांना जिल्हा शल्यचिकित्सकांनी तडकाफडकी निलंबित केले. डॉ.राजवर्धन गवई हे मागील तीन दिवसांपासून गैरहजर होते. विशेष म्हणजे धाड येथे गामीण रुग्णालय आहे; मात्र येथे कोणत्याही सुविधा नाहीत. रुग्णांना भरती केले तेव्हा रुग्णालयात पाणीसुद्धा नव्हते, तर वैद्यकीय अधीक्षक डॉ.गवई हे गैरहजर होते. रुग्णालयाच्या नातेवाईकांचा रोष लक्षात घेता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शिवाजीराव गजरे यांनी डॉ.गवई यांना निलंबित केले.