शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला

By admin | Updated: December 8, 2014 01:33 IST

एका महिन्यात ६ खून, १५ आत्महत्या व ३0 हाणामारीची प्रकरणे.

बुलडाणा : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याचे बोलले जात आहे; मात्र प्रत्यक्षात नागरिकांमध्ये कायद्याची भीती उरलीच नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. गत एका महिन्यात जिल्हाभरात वैमनस्यातून वचपा काढण्यात सहा लोकांची हत्या करण्यात आली. तर कौटुंबिक, सामाजिक व्यवस्थेला कंटाळून १५ लोकांनी मृत्यूला कवटाळले. शिवाय ३0 ठिकाणी हाणामारीच्या प्रकारातून सामाजिक शांतात भंग झाली. मागील नोव्हेंबर महिन्याच्या अपराधाविषयी घटनांचा लेखाजोखा घेतला असता, गुन्ह्याचे प्रमाण वाढलेले आढळून आले. यामुळे किती मोठय़ा प्रमाणात हानी झाली, हे त्या घटनांचे परिणाम भोगणारे कुटुंबीयच सांगू शकेल. यात काही गुन्हे घराच्या चार भिंती आड घडले, तर काही समाजात घडले; मात्र यामुळे समाज मन पूर्णपणे ढवळून निघाले. मानसिक रोगांना बळी पडल्याने, बुद्धी आणि विवेक हरवून बसलेल्या काहींनी आत्महत्यासारखा मार्ग स्वीकारला. तर काहींनी वैमनस्यला खतपाणी घालून हत्या करण्याचा मार्ग स्वीकारला.देऊळगाव राजा येथे ३0 नोव्हेंबर रोजी वाहनाच्या चाकाखाली चिरडून युवकाने आ पल्याच सहकार्‍याची हत्या केली. तर २ डिसेंबर रोजी कौटुंबिक कलहातून खामगाव येथे देरानीने जेठानीला भोसकून यमसदनी पाठविले. याच दिवशी आपसी वैमनस्यातून हत्येची सुपारी देऊन िपंपळगावराजा येथे एकाचा खून करून विहिरीत फेकले. खामगाव शहरातील सिव्हिल लाईन भागात दारू पिण्याच्या सवयीतून पती-पत्नीत वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, यातून पत्नीला संपविण्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडला. पैशाच्या वादातून सहकार्‍यांनी एका इसमाच्या गळ्याभोवती चाकू फिरविल्याची घटना वडनेर भोलजी येथे २१ नोव्हेंबर रोजी घडली. तर अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी डोणगाव शिवारात घडली. याशिवाय बुलडाणा, लोणार, संग्रामपूर, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर, देऊळगावराजा, चिखली तालुक्यात गळफास व विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या करण्याचे सत्र सुरू आहे. यात विद्यार्थी व विवाहितेचा समावेश आहे.