शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटात कु-हाडीने हाणामारी

By admin | Updated: November 29, 2014 22:54 IST

लोणार तालुक्यातील घटना; परस्परविरोधी तक्रारी २५ जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल.

मेहकर (बुलडाणा): लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटात कुर्‍हाडीने हाणामारी झाल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून मेहकर पोलीस स्टेशनला २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्यातील १६ जणांविरुद्ध अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, अंजनी खुर्द येथील लक्ष्मीबाई परमेश्‍वर अवसरमोल हिच्यासोबत गावातीलच नवृत्ती भीमराव अवसरमोल याचा घराच्या सांडपाण्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये नवृत्ती भीमराव अवसरमोल यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून लक्ष्मीबाई अवसरमोल, तिचा पती परमेश्‍वर अवसरमोल तसेच नातू व दीर यांना काठी व कुर्‍हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच लक्ष्मीबाई अवसरमोल हिला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद लक्ष्मीबाई अवसरमोल हिने मेहकर पोलीस स्टेशनला दिली.त्यावरून पोलिसांनी नवृत्ती भीमराव अवसरमोल, रवी भीमराव अवसरमोल, संगीता नवृत्ती अवसरमोल, दिनकर विठ्ठल अवसरमोल, भगवान होळकर, मंदाबाई चौधरी, अमोल भगवान गायकवाड, बन्सी गायकवाड, दत्ता भोकरे, अंकुश भाऊराव अवसरमोल, गंगुबाई भीमराव अवसरमोल, संतोष भीमराव अवसरमोल, मंगला संतोष अवसरमोल, रमा रवी अवसरमोल, त्र्यंबक भागाजी अवसरमोल, सिद्धार्थ अवसरमोल सर्व रा. अंजनी खुर्द यांच्याविरुद्ध अप.क्र. २१0/१४ कलम ३0७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५0४ भादंविनुसार सह कलम ३ (१), (१0), ३ (२) (५) अजा कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. तर आमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार का दिली म्हणून गौतम परमेश्‍वर अवसरमोल यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून संगीता बबन ऊर्फ नवृत्ती अवसरमोल हिच्यासह कुटुंबातील इतरांना काठी व कुर्‍हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद संगीता अवसरमोल हिने मेहकर पोलिस स्टेशनला दिली आहे.