शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Coronavirus : त्या’ मृत रुग्णाच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 10:45 AM

स्वॅबचे नमुने नागपूर येथे थेट आरोग्य विभागाच्या कर्मचाºयामार्फत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कथितस्तरावरील कोराना संशयित रुगणाचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असली तरी मृत व्यक्तीच्या गळा आणि नाकाच्या स्वॅबच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली.सौदी अरेबियातून बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात गावी परत आलेल्या ७१ वर्षीय  कोरोनाच्या संशयित रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारादरम्यान १४ मार्च रोजी मृत्यू झाला आहे. मधुमेहास, ह्रदयरोग आणि श्वसनाचा आजार या रुग्णास होता. खासगी रुग्णालयातून त्यास  जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. १४ मार्च रोजीच ‘हार्ड अ‍ॅन्ड फास्ट’ तत्वावर या रुग्णाचे गळा व नाकातील स्वॅबचे नमुने नागपूर येथे थेट आरोग्य विभागाच्या कर्मचाºयामार्फत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, १५ मार्च रोजी सायंकाळी किंवा १६ मार्च रोजी त्याचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबियांसह  संबंधीत व्यक्तींना आरोग्य विभाग मॉनिटरींग करत असून  आजारी असलेल्यांना विलकीकरण कक्षात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोबतच अन्य व्यक्तींना होम क्वारंटीन करण्याचे सुचित केले असून आरोग्य विभागाचे एक पथक त्यानुषंगाने स्क्रीनींग करत आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनीही जोपर्यंत या प्रकरणात अहवाल प्राप्त होत नाही, तोवर कुठलेही अधिकृत स्टेटमेंट करता येणार नाही. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनावर भर द्यावा.

सुरक्षा किटद्वारेच शवविच्छेदनमृत्यू झालेल्या या संशयित रुग्णाचे शवविच्छेदनही डॉक्टरांनी सुरक्षा किटचा वापर करूनच केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली. संशयित रुग्णांची ज्या प्रमाणे विलगीकरण कक्षात काळजी घेतली जाते, त्याच पद्धतीने शवविच्छेदन करतानाही आरोग्य विभागाकडून योग्य काळजी घेण्यात येत असल्याचेचेही त्यांनी सांगितले. सुरक्षेबाबत कुठल्याही उणिवा राहणार नाही, याची काळजीही घेण्यात आली.

 नागरिकांनी सतर्कता बाळगावी. गर्दीची ठिकाणे टाळावी. हातांची स्वच्छता राखावी. परिसरही स्वच्छ ठेवावा. हात पाण्याने व साबणाने धुबावे. साधा रुमालही मास्क म्हणून वापरला तरी चालतो. श्वसन संस्थेशी संबंधीत आजार असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करावी. कोरोना व्हायरसचा रिस्क पिरेड हा १४ दिवसांचा आहे. त्यानुषंगानेही नागरिकांनी काळजी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.- डॉ. प्रेमचंद पंडीतजिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा