शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

बारा बलुतेदार अर्थसहाय्य योजनेत अपहार झाल्याची तक्रार

By admin | Updated: May 2, 2017 23:28 IST

बुलडाणा- बारा बलुतेदार अर्थसहाय्य योजनेत अपहार झाल्याची तक्रार बारा बलुतेदार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

बुलडाणा: बारा बलुतेदारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी १५ वर्षापूर्वी राज्य शासनाने अर्थसहाय्य योजना राबविली; परंतु तत्कालीन जिल्हा उपनिबंधक व जिल्हा सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी संगनमत करून या योजनेत अपहार केला असून, याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बारा बलुतेदार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात नमूद आहे की, सन २००२-०४ च्या दरम्यान तत्कालीन राज्य सरकारने राज्यातील बारा बलुतेदारांच्या उन्नतीसाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबविली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला त्या-त्या जिल्ह्यातील बलुतेदारांच्या व्यवसायांना पतपुरवठा करण्याचे निर्देश तत्कालीन सहकार आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले होते; मात्र जिल्हा उपनिबंधक व जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी या योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला. या योजनेतून जिल्ह्यात ५८ लाभार्थींना प्रत्येकी ३० हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात आले; मात्र यापैकी केवळ ५ लाभार्थी खरे बलुतेदार आहेत. उर्वरित ५३ महिला लाभार्थींपैकी १० महिला केडर अधिकाऱ्यांच्या पत्नी, ४ जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पत्नी, ६ पतसंस्था कर्मचाऱ्यांच्या पत्नी, ३० लाभार्थी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांच्या पत्नी, १ लाभार्थी तालुका उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याची पत्नी तर २ लाभार्थी पाडळी येथील संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पत्नी असल्याचे नमूद करून ५३ लाभार्थी बोगस असल्यामुळे या योजनेत अपहार झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.