शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक घालतात रात्रीची गस्त

By admin | Updated: November 30, 2014 23:18 IST

मेहकरात चोरांचा धुमाकूळ : पोलिसांची निष्क्रीयता.

मेहकर (बुलडाणा) : सध्या शहरामध्ये चोरट्यांनी गेल्या आठवडाभरापासून धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मेहकरवासी भयभीत झाले आहेत. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी मेहकर पोलिसांकडून कोणतीही ठोस पावले उचलल्या जात नसल्याने पोलिसांवर विसंबून न राहता आता नागरिकांनीच आपापल्या परिसरामध्ये रात्रीची गस्त घालणे सुरु केले आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.मागील आठवड्यामध्ये शिवाजी नगरमधील शिक्षक राजु बळीराम उगले हे घरी नसतांना दिवसा चोरट्यांनी घरात घुसून १ लाख ८६ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेला. तर शिक्षक कॉलनीमधील सुनिल सिताराम सावळे यांचे घरात घुसून २७ नोव्हेंबर रोजी १७ हजार रुपयांचा माल चोरुन नेला. तसेच २९ नोव्हेंबरचे पहाटे डोणगाव रोडवरील खा.प्रतापराव जाधव यांचे भाऊ माधवराव जाधव यांचे घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता. या पसिरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी हैदोस घातला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांच्या भितीने लोक बाहेरगावी जाणे टाळत आहेत. पोलिसांवर विसंबुन न राहता लोकांनी आपापल्या परिसरामध्ये ५ ते ६ जणांचा गट तयार करुन रात्री १ ते ५ वाजतापर्यंत स्वत: आपल्या भागात गस्त घालत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन काहीतरी उपाययोजना करावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.