पाण्याच्या बादलीमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:19 IST2020-02-22T15:19:23+5:302020-02-22T15:19:36+5:30

बाथरूम घराच्या बाहेर अंगणात असल्याने लवकर ही घटना कुणाच्या निदर्शनास आली नाही.

Child death by drowned in a bucket of water | पाण्याच्या बादलीमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू

पाण्याच्या बादलीमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये बुडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील पारखेड येथे शुक्रवारी सकाळी घडली.
पारखेड येथील सागर सावळे यांची दीड वषार्ची मुलगी चंचल ही सकाळी खेळतांना बाथरूममध्ये गेली. या ठिकाणी पाण्याने भरलेली मोठी बकेट ठेवलेली होती. चंचल अचानक या बकेटमध्ये पडली. मात्र बाथरूम घराच्या बाहेर अंगणात असल्याने लवकर ही घटना कुणाच्या निदर्शनास आली नाही. थोड्यावेळाने हा प्रकार लक्षात आला असता कुटूंबियांनी तत्काळ तिला येथील सामान्य रूग्णालयात आणले, मात्र डॉक्टरांनी तपासणी कुरून चंचलला मृत घोषीत केले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामीण पोलिसांनी प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: Child death by drowned in a bucket of water