फटाका कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: May 2, 2017 23:50 IST2017-05-02T23:50:10+5:302017-05-02T23:50:10+5:30

नांदुरा : जळगाव खान्देशजवळील शिरसोली शिवारातील शामा फायर वर्क्स या फटाक्यांच्या कंपनीत लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजल्याने दोघांचा मृत्यू झाला.

Both of them died in a firecracker explosion | फटाका कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू

फटाका कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू

नांदुरा : जळगाव खान्देशजवळील शिरसोली शिवारातील शामा फायर वर्क्स या फटाक्यांच्या कंपनीत लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजल्याने दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये मृत्युमुखी पडलेला राजेंद्र बाबूराव तायडे हा जिगाव, ता. नांदुरा येथील रहिवाशी आहे.
मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे फटाक्याच्या दारूने पेट घेतला व मोठा स्फोट झाला. यामध्ये हेमंत जैस्वाल (वय ४५) रा.तामिळनाडू व राजेंद्र बाबूराव तायडे (वय ३५) वर्षे रा. जिगाव, ता. नांदुरा ह.मु. शिरसोली जळगाव यांचा मृत्यू झाला. राजेंद्र हा अत्यंत मेहनती होता. त्याने आपल्या आई-वडिलांनाही त्यांच्याकडेच नेले होते. त्याचे पश्चात आई-वडील, पत्नी व २ मुले असा आप्त परिवार आहे. राजेंद्रच्या मृत्युमुळे जिगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Both of them died in a firecracker explosion