शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग योजनेतून केळी गायब

By admin | Updated: November 30, 2014 23:11 IST

बुलडाणा जिल्ह्यासाठी शासन स्तरावरुन अनुदान प्रक्रिया सुरु करण्याची मागणी.

संग्रामपूर (बुलडाणा) : खारपाणपट्यातील शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी कृषी विभागाकडून फळपिकांच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येते. मात्र या योजनेत केळी पिकाचे बुलडाणा जिल्ह्याला लक्ष्यांकच देण्यात आले नाही. याबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात नव्या सरकारने सकारात्मक निर्णय घेवून पूर्वीसारखे अनुदान सुरु करुन केळी पिकाच्या लागवडीला चालना द्यावी अशी अपेक्षा आहे.जिल्ह्याला या अगोदर केळी पिकाच्या लागवडीसाठी शासनाच्या कृषी विभागाकडून इतर फळ पिकासारखे अनुदानाची तरतूद होती. केळी लागवडीचे जिल्ह्यातून जळगाव जा. आणि संग्रामपूर या दोन तालुक्यातच क्षेत्र जास्त आहे. म्हणून लक्ष्यांक ही या दोन तालुक्यासाठीच दिले जात होते. संग्रामपूर तालुक्यात ४0 ते ५0 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. या पिकाच्या उत्पादनासाठी पाणी व खर्च भरपूर लागत असल्याने या पिकाकडे शेतकर्‍यांचा नकारात्मक दृष्टीकोण होता. मात्र शासनाने या पिकासाठी अनुदानाची तरतूद करुन नवीन लागवडीचे क्षेत्र वाढीसाठी मदत केली. त्याकरिता टिश्युकल्चर वाण शेतकर्‍यांच्या हातात आल्याने एकट्या संग्रामपूर तालुक्यात आज जवळपास १00 ते १२0 हेक्टर क्षेत्रामध्ये टिश्यु केळीची लागवड झालेली आहे. हा भाग खारपाणपट्यात येत असल्याने सिंचनासाठी शेतीला बारमाही पाण्याची व्यवस्था झाल्यास केळी उत्पादनाच्या बाबतीत हा भाग अग्रेसर ठरेल अशी भौगोलिक स्थिती आहे. नवनव्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी या भागामध्ये विशेष बाब म्हणून मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत फलोत्पादन कार्यक्रमही राबविण्यात आला. जळगाव आणि संग्रामपूर हे दोन तालुके केळी पिकासाठी योग्य असल्याने नव्या सरकारकडून याचा विचार व्हावा. केळीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता काकणवाडा गावात केळी उत्पादकांनी पहिली शेतमाल विक्रीची कंपनी स्थापन करुन या भागातील शेतकर्‍यांसाठी नवी आशा निर्माण करण्याचे काम केले. सोबतच याच केळी उत्पादनावर प्रक्रिया उद्योग उभारणीचाही मोठी संधी आहे. त्यासाठी केळी उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरुन अनुदान प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी होत आहे.