शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कोवीड रुग्णालयांच्या ऑडीटसाठी पथक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 14:56 IST

जिल्ह्यात कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकूण आठ रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे.

- नीलेश जोशी बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी चाचण्यांचा वेग वाढून रुग्णांना त्वरित अैाषधोपचार मिळावा या दृष्टीकोणातून जिल्ह्यात कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकूण आठ रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाबाधीत तथा संदिग्धांवर केलेल्या उपचारापोटी रुग्णालयाने दिलेल्या देयकांचे ऑडीटच महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक करणार आहे. त्यासंदर्भाने सध्या हालचालींनी वेग घेतला आहे.यासंदर्भात बुलडाणा जिल्ह्यात खासगी रुग्णालयांनी अवाजवी देयकांची रुग्णांना आकारणी केली नसली तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाबाधीतांकडून रुग्णालयांनी जादा पैसे उकळू नये म्हणून या रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या प्रत्येक रुग्णाच्या देयकांचे ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अनुषंगीक निर्देश ऑक्टोबर महिन्याचा कोवीड संसर्ग प्रतिबंध आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुषंगाने आता  आरोग्य विभाग व महसूल विभागाचे एक पथक गठीत करण्यात आले असून  जिल्ह्यात परवानगी दिलेल्या खासगी कोवीड रुग्णालयामध्ये किती रुग्णांवर उपचार झाले, त्यांना त्यात रुग्णालयाने किती खर्च आकारला. बेड, अैाषधी, डॉक्टरांची व्हीजीट फी, सफाई यासह तत्सम बाबींसाठी किती खर्च लावण्यात आला याचे अंकेक्षणच ही दोन्ही पथके करणार आहे. त्यासंदर्भाने एक आदर्श तक्ताही तयार करण्यात आला असून त्या तक्क्याच्या बाहेर जर अवाजवी स्वरुपात रुग्णांकडून अधिक पैसे घेतले गेले असल्यास संबंधीतांवर कारवाई केली जाईल, असे संकेतच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.

आठ खासगी रुग्णालयांना मान्यता

बुलडाणा जिल्ह्यात कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आठ रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मलकापूर एक, मेहकर दोन, सिंदखेड राजा एक, देऊळगाव राजा एक, चिखली एक, खामगाव एक, शेगाव दोन, बुलडाणा येथील एका रुग्णालयाचा समावेश आहे. यासोबतच बुलडाणा शहरात आणखी दोन खासगी रुग्णालयांना कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता देण्यात येणार असल्याचे संकेतही सूत्रांनी दिले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या