शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी योजनेंतर्गत सेवा देण्यास डॉक्टरांची अनास्था

By admin | Updated: November 20, 2014 23:39 IST

खासगी दवाखाने योजना राबविण्यास नकार

मलकापूर : शासनाने गोरगरीब नागरिकांना मोठय़ा आजारावर सवलतीच्या दरात उपचाराचा लाभ व्हावा, यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली; मात्र मलकापूर येथील एकाही खासगी दवाखान्याने ही योजना राबविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून सहभागी होण्याची तयारी दर्शविली नसल्याचे वास्तव भाजपा प्रज्ञावंत सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश देशपांडे यांच्या पाठ पुराव्यातून हा प्रकार समोर आला आहे.येथील भाजप प्रज्ञावंत सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश देशपांडे यांनी शासनाशी केलेल्या पत्रव्यवहारात नमूद केले की, मलकापूर शहर व तालुक्याची लोकसंख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने शेतमजूर तथा खासगी मजुरी करणार्‍यांचा समावेश आहे. महिलांचे ह्यसिझरह्ण असो पुरूषांच्या विविध आजारांवरील शस्त्रक्रिया, त्यासाठी रूग्णांना अकोला, जळगाव, औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणी जावून महागड्या उ पचाराचा सामना करावा लागतो. परिणामी पैशांची जुळवाजुळव करताना जनसामान्यांची दमछाक होते. त्यासाठी लक्ष देण्याची विनंती देशपांडे यांनी उ पविभागीय अधिकार्‍यांमार्फत शासनाकडे केली होती. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव गांधी जीवनदायी योजना यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये योजनेत सहभागी असलेल्या रूग्णालयांची माहिती दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ६ तालुक्यातील खासगी दवाखान्यांनी योजनेत ऑनलाईन सहभागी होण्याची तयारी दर्शविली; मात्र मलकापूर येथील एकाही खासगी दवाखान्याने या योजनेत ऑनलाईन अंगीकृत होण्याची तयारी दर्शविली नाही, अशी माहिती योजनेचे उपविभागीय अधिकारी यांनी पत्रात दिली आहे.त्यामुळे शासनाची योजना जरी जनसामान्यांसाठी असली तरी स्थानिक स्तरावरील खासगी दवाखान्यांच्या अनास्थेमुळे गरीब रूग्णांची फरफट होणार असल्याचे नरेश देशपांडे यांच्या पाठपुराव्यातून समोर आले आहे.