शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविका, पेन्शनर्सचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 01:57 IST

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : हक्कासाठी हजारो आंदोलनकर्ते उतरले रस्त्यावर

बुलडाणा, दि. २0- आपले हक्क व विविध न्याय्य मागण्यांकडे शासनाचे वारंवार दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मागण्या प्रशासन दरबारी रेटून धरण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. यात ईपीस १९९५ जनआंदोलन समिती या पेन्शनधारक संघटनेकडून पेन्शनर्सच्या हक्कासाठी तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) कडून अंगणवाडीसेविकेच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.पेन्शनधारकांच्या मागण्यांचा गेल्या बजेटमध्ये कुठलाही विचार झाला नाही, त्यामुळे आजही बरेच पेन्शनधारक विविध योजनांपासून वंचित आहेत, त्यामुळे पेंशनधारकांच्या विविध मागण्या प्रशासन दरबारी मांडण्यासाठी आज २0 मार्च रोजी ईपीस १९९५ जनआंदोलन समिती या पेन्शनधारक संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले, यावेळी जिल्ह्यातील जवळपास तीन हजार पेन्शनधारक सहभागी झाले होते. भगतसिंग कोशियारी कमिटी लागू करा, एक हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केल्यानंतर ५८ वर्षे वयोर्मयादेचा चुकीचा नियम लावण्यात आला, त्यामुळे ३0 लाख पेन्शनधारक लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे ही अट रद्द करण्यात यावी, आदी विविध मागण्यांसाठी कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. स्थानिक टिळक नाट्य क्रीडा मंदिरपासून निघालेला मार्चा संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी कमांडर अशोक राऊत, एन.एम.काझी, हिम्मतराव देशमुख, वीरेंद्र सिंग, बी.एम.कायंदे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना आपल्या विविध मागण्यांबाबत निवेदन दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष वीरेंद्र सिंग यांनी मोर्चाला संबोधित केले, तसेच उपस्थित सर्व पेन्शनधारकांकडून महागाई भत्ता मिळण्याबाबत अर्ज भरुन घेण्यात येऊन भविष्य निर्वाह निधी कार्यालयास पोस्टाद्वारे पाठविण्यात आले. या आंदोलनात यावेळी बी.बी.चौधरी, एन.एम.कष्टे, विलास पाटील, जे.जे.गरकल, बी.एम.कायंदे, ए.एन. सुरोशे, एस.एन.बैरवार, एस.एम. सोमवंशी, महावीर काळे, अप्पा सुरडकर, डी.एस.पाटील, सुधीर चन्नकेशला, एस.एस.पवार, महंमद अकील, एस.एम.जैन, महंमद खान, मुकुंद देशपांडे, शेख जुगन, बाळा महाजन, हाजी चालक, व्ही.आर.लाडे, भास्करराव लहाने, श्रीराम शेळके, पंढरीनाथ कोल्हे, गोविंद सोनुने, आनंद चणखोरे, एस.ओ.गलबले, डी.आर. साळोख, पी.एच.पांधी यांच्यासह जिल्ह्याभरातील हजारो पेन्शनधारक महिला, पुरुष सहभागी झाले होते.