शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चाईल्ड लाईनचा २१२ बालकांना आधार

By admin | Updated: November 30, 2014 23:17 IST

बुलडाणा: एका फोन कॉलने संकट टाळले

बुलडाणा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून येणार्‍या या सेवांप्रमाणेच समाजातील संकटग्रस्त मुलांना आता चाईल्ड लाईन संस्थेच्या १0९८ या क्रमांकाचा आधार मिळाला आहे. जेथे शसकीय यंत्रणा पोहचण्यास काही वेळ लागतो, तेथे चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक पोहचत आहेत. त्यामुळेच बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात २१२ मुलांमुलींना चाईल्ड लाईनमुळे आधार मिळाला आहे.मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय पालक आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, त्यांचे लाडही नेहमीच पुरविले जातात. पण प्रत्येक कुटुंबातील मुलांच्या नशिबात असे लाड असेलच, याची शाश्‍वती नसते. त्यामुळे बर्‍यावेळा काही मुले कामाला जुंपली जातात, तेथे त्यांना मारझोड केली जाते. काही मुलांना दारूड्या बापाचा त्रास असतो, काही मुलेमुली लैगिंक अत्याचाराला बळी पडतात. त्यामुळे अशी मुले घरून पळून जाण्यास किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात.संकटात सापडलेल्या अश्या मुलांना तत्काळ मदत मिळणे गरजेचे असते. याच उद्देशाने जिल्ह्यात बुलडाणा चाईल्ड लाईन संस्था सुरू करण्यात आली आहे. यासाठी १0९८ हा संपर्क क्रमांक ठेवण्यात आला. या क्रमांकावर आलेला कॉलवर ज्या भागातील, शहरातील व गावातील तक्रार असेल, तेथील सदस्य आणि समुपदेशकांना त्याबाबत माहिती दिली जाते व काही वेळातच चाईल्ड लाइनचे स्वयंसेवक घटनास्थळी पोहचतात व पिडीत बालकांना मदत करतात.