शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद विश्रामगृह झाले इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 00:53 IST

स्थानिक गांधी चौकात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्रामगृह अत्यंत दयनिय स्थितीत उभे आहे. इमारत विश्रामगृहाची असली तरी ते विश्रामगृह ...

विश्रामगृहाचे भवितव्य राजकारणातील व्यक्तींच्या इच्छाशक्तीवर अवलंबून पवनी : स्थानिक गांधी चौकात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्रामगृह अत्यंत दयनिय स्थितीत उभे आहे. इमारत विश्रामगृहाची असली तरी ते विश्रामगृह सद्यस्थितीत इतिहास जमा झालेले आहे आणि पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय कार्यालय तेथे स्थानांतरीत करण्यात आलेले आहे.गत ३५ वर्षापूर्वी पवनी तालुक्याचे ठिकाण नव्हते. त्यावेळी जिल्हा परिषद विश्रामगृह सराव या नावाने प्रसिद्ध होते. त्यावेळी लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी जिल्हास्तरावरून अधिकारी महिन्याकाठी सरावमध्ये येवून बसत व ग्रामीण जनतेच्या समस्या ऐकल्या जात होत्या. विश्रामभवनाच्या वऱ्हांड्यात त्यावेळी लोकांची वर्दळ असायची. काळात बदल झाला. अधिकारी सभांमध्ये व्यस्त झाले. पवनी तालुक्याचे ठिकाण झाले. लोकांना फारस्या समस्या उरल्या नाहीत. त्यामुळे सरावाची गरज संपली त्याचे विश्रामगृहात रूपांतर झाले. अलिकडे विश्रामगृहाची सुद्धा गरज ठरली नसावी. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. विश्रामगृह डागडूजी करून वापरण्या योग्य राहिले नाही. त्यांची नावाने बांधणी करणे गरजेचे आहे. चार पाच वर्षापुर्वी विश्रामगृह निर्लेखित करून नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने पारित केल्याचे आहे. परंतु अंमलबजावणी झालेली नाही. विश्रामगृहाची पुर्नबांधणी करायची म्हणजे बांधकामाचे मंजूरीपासून सर्व सोपस्कार करावे लागणार आहेत. पवनी शहरातील ऐतिहासिक गेटपासून ३०० मीटरपर्यंत बांधकामासाठी पुरातत्व विभाग परवानगी देत नाही आणि विश्रामगृह अवघ्या ५० मिटरच्या आत आहे म्हणजे शासकीय बांधकामांनासुद्धा पुरातत्व विभागाची परवानगी मिळणार नाही आणि जिल्हा परिषदेने तरतुद जरी केली तरी सहजरित्या बांधकाम करता येणार नाहीत त्यामुळे दोन सुट असलेले ब्रिटीशकालीन विश्रामगृह अखेर इतिहासजमा झाले, असे मानल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. विश्रामगृहाचे भवितव्य राजकारणातील व्यक्तींच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ठोस पावले उचलली तर विश्रामगृहास गतकालीन वैभव प्राप्त होण्यास विलंब लागणार नाही हे मात्र खरे आहे.