शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोरोनाच्या सावटात मजुरांचा ३५० किमी सायकलने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 6:00 AM

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने सर्वच जण धास्तावले आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. कुटुंबसोडून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या मजुरांना आपल्या कुटुंबाची काळजी सतावत आहे. अड्याळ येथे आलेल्या १२ मजुरांचीही अशीच घालमेल सुरू होती. काय करावे याची चिंता सतावत होती. ही बाब त्यांनी आपले ठेकेदार हेमंत शृंगारपवार यांना सांगितली. त्यांनी येथेच रहा सर्व व्यवस्था होईल, असे सांगितले.

ठळक मुद्देअड्याळहून निघाले मध्य प्रदेशाकडे । ठेकेदाराने दिल्या सायकली उपलब्ध करून

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पोटाची खडगी भरण्यासाठी ते अड्याळमध्ये आले. गेल्या कित्येक महिन्यापासून गावात राहू लागले. गावकऱ्यांशी लडा लागला. मात्र कोरोनाच्या धास्तीने घर कुटुंबाची आठवण सतावू लागली. गावी जाण्याचा कोणताच मार्ग नाही. अशा स्थितीत ठेकेदाराने उपलब्ध करून दिलेल्या सायकलीने १२ मजुरांनी तब्बल ३५० किलोमीटर प्रवास करून मध्य प्रदेशातील आपले मंडला गाव गाठले.कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने सर्वच जण धास्तावले आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. कुटुंबसोडून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या मजुरांना आपल्या कुटुंबाची काळजी सतावत आहे. अड्याळ येथे आलेल्या १२ मजुरांचीही अशीच घालमेल सुरू होती. काय करावे याची चिंता सतावत होती. ही बाब त्यांनी आपले ठेकेदार हेमंत शृंगारपवार यांना सांगितली. त्यांनी येथेच रहा सर्व व्यवस्था होईल, असे सांगितले. मात्र कुणाचेही मन कामात लागत नव्हते. गावी पाठविण्यासाठी शक्कल लढविण्यात आली. शृंगारपवार यांनी सहा नव्या कोºया सायकली उपलब्ध करून दिल्या. त्या १२ जणांसोबत गावी पोहचेपर्यंतच्या जेवनाची व्यवस्था करून दिली. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हे १२ कामगार सायकलने आपल्या गावाकडे निघाले. मजल दरमजल करीत शनिवारी दुपारी १२ वाजता हे सर्वजन आपल्या गावात पोहचले. यादरम्यान त्यांनी तब्बल ३५० किलोमीटरचा प्रवास केला.महानगरातून शेकडो मजूर गावाकडे जात आहे. अनेक कंत्राटदारानी आपल्या मजुरांना वाºयावर सोडले. मात्र अड्याळ येथील हेमंत शृंगारपवार यांनी मदतीचा हात दिला. गावी जाण्यासाठी सायकली उपलब्ध करून दिल्या. एवढेच नाही तर प्रवासात वारंवार या मजुरांसोबत मोबाईलवरून संवाद साधत होते. महाराष्ट्र मध्यप्रदेशाच्या सीमेवर या मजुरांना पोलिसांनीही मोठी मदत केली. सहृदय नागरिकांच्या सहकार्याने मजूर एकदाचे गावी पोहचले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस