शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वन्यजीव-मानवी संघर्ष वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात ९३१.२४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. घनदाट जंगलात वाघ, बिबटे, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी आहेत. गत अनेक वर्षांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष होत आहे. परंतु अलीकडच्या काळात या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलामध्ये मानवाचा संचार वाढल्याचे दिसते. जिल्ह्यात कुठेही एखाद्या गावात वन्यप्राण्याने शिरून कुणावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : घनदाट जंगलाची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या भंडारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात वन्यजीव मानवी संघर्ष वाढल्याचे दिसून येत आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला, तर वाघ, बिबटे, निलगाय, रानडुकरांच्या शिकारीच्या घटनाही पुढे आल्या. बहुतांश घटना जंगलात घडल्या असून, गावात शिरून कोणत्याही वन्यप्राण्याने अद्यापपर्यंत तरी हल्ला केला नाही. मात्र हल्ल्याची एखादी घटना घडली की वन्यजीवाला दोषी ठरवून त्यांच्याच बंदोबस्ताची मागणी केली जाते.भंडारा जिल्ह्यात ९३१.२४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. घनदाट जंगलात वाघ, बिबटे, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी आहेत. गत अनेक वर्षांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष होत आहे. परंतु अलीकडच्या काळात या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलामध्ये मानवाचा संचार वाढल्याचे दिसते. जिल्ह्यात कुठेही एखाद्या गावात वन्यप्राण्याने शिरून कुणावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या नाहीत. तीन महिन्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी गेला, तर रानडुकराच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.फेब्रुवारी महिन्यात लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथे सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार मारले होते, तर मंगळवार ५ एप्रिल रोजी इंदोरा जंगलात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या इसमाला वाघाने ठार केले. या दोन्ही घटना जंगलात घडल्या आहेत. वनविभाग वारंवार जनजागृती करून नागरिकांना जंगलात जाण्यापासून परावृत्त करतात. मात्र अनेक जण जीव धोक्यात घालून जंगलात जातात. हल्ला झाला की वन्यप्राण्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली जाते.

शिकारीच्या घटनात वाढ- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्याच्या घटनांसोबतच वर्षभरात सहा वाघ, चार बिबटे आणि निलगाय, रानडुकराच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी आता मानवानेच संयम बाळगून जंगलाला सुरक्षित ठेवण्यासाठी जंगलातील संचार कमी करणे गरजेचे आहे. वनविभागाच्यावतीने जनजागृती केली जात असली तरी नागरिकांचा मात्र फारसा प्रतिसाद मिळत नाही. मोहफूल संकलन करण्यासाठी अनेक जण जंगलात जातात. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाही. त्यामुळे हल्ल्याच्या घटना वाढत आहे.

मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे. वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सभा घेतल्या जातात. एखादी घटना घडली तर परिसरातील गावात दवंडी देऊन जंगलात न जाण्याची सूचना केली जाते. - राहुल गवई, उपवनसंरक्षक भंडारा 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforestजंगल