शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणा भेसळीचा खेळ कधी थांबणार?

By admin | Updated: November 10, 2014 22:38 IST

दूध असो किंवा दही, तेल असो किंवा तूप, पेट्रोल असो वा डिझेल, खवा असो वा रवा, फळे असो वा खाद्य पदार्थ, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली अशी एकही वस्तू नाही

भंडारा : दूध असो किंवा दही, तेल असो किंवा तूप, पेट्रोल असो वा डिझेल, खवा असो वा रवा, फळे असो वा खाद्य पदार्थ, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली अशी एकही वस्तू नाही जी भेसळीपासून मुक्त आहे. यापासून होणारे आजार दिवसेंदिवस वाढतच असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले असल्याने भेसळ नव्हे विषच असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. सकाळी घरी येणारे किंवा खरेदी करून आणलेले दूधही शुद्ध असेल याची हमी नाही. आजारपणाच्या काळात बाजारातून आणलेली फळेही रासायनिक पदार्थाचा वापर करून पिकवली जात असल्याने ती खाण्यास योग्य नाही, पेट्रोलमध्ये पाणी मिसळवले जात असल्याने वाहने नादुरुस्त होत आहेत. डिझेलमध्ये रॉकेलची सर्रास भेसळ केली जात असून त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. खाद्य तेलाच्याबाबतीतही भेसळ नवी नाही. हॉटेल्स, खानावळीच नव्हे तर मोठ्या हॉटेल्समधील खाद्य पदार्थात भेसळ नसेल असा दावा आज कुणीही करू शकत नाही. मिठाईची वाढती मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाईंची विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त खवा जप्त केला होता. मिठाईसाठी वापरण्यात येणाऱ्या खव्यातच भेसळ केली जात असल्याने अनेक वेळा अशी मिठाई खाऊन लहान मुलांना पोटाचे विकार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात 'फास्ट फूड'कडे तरुणाई आणि लहान मुलांचा कल वाढला आहे.शहरातील विविध भागात असलेली छोटी हॉटेल्स, खानावळी यांची नियमित तपासणी होत नाही. दूध - दूधाचा थेंब तिरप्या गुळगुळीत पट्टीवर टाकल्यास तो झटकन घरंगळेल व पांढरा ओघळ दिसणार नाही. जर दूध शुद्ध असेल तर त्याचा थेंब तेथेच थांबेल अथवा पांढरा ओघळ खाली येईल. दूधात थोडे आयोडिनचे द्रावण टाकल्यानंतर निळा रंग आल्यास त्यामध्ये स्टार्च (पिठूळ पदार्थ) मिसळलेले आहेत, असे समजावे. बाकी भेसळीच्या पदार्थांच्या चाचण्या प्रयोगशाळेमध्ये करता येतात. स्वास्थ्यासाठी दूध तापवूनच पिणे अत्यावश्यक आहे. खवा - रताळे, शिंगाडा पीठ, वनस्पती तुपाची खव्यात भेसळ केली जाते. खवा हातावर घेऊन रगडल्यास हाताला चिकटून घाण वास येतो. भेसळ असलेला खवा खाल्ल्यास तो टाळूला चिकटतो. भेसळ असलेल्या खव्यात आयोडिनयुक्त पाणी टाकल्यावर जांभळा रंग येतो.तूप - पातळ केलेल्या एक चमचा तुपात किंवा लोण्यात पाच थेंब तीव्र हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड व अर्धा चमचा साखर टाकल्यास दोन थर तयार होतात. आम्लाचा थर दहा मिनिटात लालसर झाल्यास त्यात भेसळ झाल्याचे ओळखावे. लोणी, दही किंवा पिठाची भेसळ ओळखण्यासाठी त्यावर टिंचर आयोडिनचे पाच थेंब टाकावेत. जांभळा रंग आल्यास भेसळ असल्याचे समजावे.मिठाई - थोडी मिठाई घेऊन त्यावर तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल टाका जांभळा रंग आल्यास मिठाईत मेटॅनील रंग असल्याचे सिद्ध होते.मिरची पावडर - मिरची पावडरमध्ये रंगवलेल्या लाकडाचा भुसा, विटांची भुकटी किंवा टॅल्कम पावडर असते. ही मिरची पूड जाळून राख करावी. प्रमाणापेक्षा जास्त राख असल्यास भेसळ समोर येते.पिठीसाखर - पिठीसाखरेत हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यास धुण्याचा सोडा किंवा खाण्याचा सोडा टाकलेला असेल तर फेस दिसून येईल. हळद पावडर - थोडी हळद पावडर पाण्यात टाकावी, त्यात हायड्रोक्लोरिक अँसिड टाकल्यास लाल रंग येतो. हा रंग काही वेळानंतरही न गेल्यास त्यात मेटॅनील येलोची भेसळ असते. या खाद्यपदार्थातही होते भेसळशहरातील काही तूप विक्रेते तुपामध्ये वनस्पती तेलाची भेसळ करतात व जास्त नफा मिळवतात. बेसन आणि रवा हा कमी दजार्चा वापरला जातो. चहामध्ये लाकडाचा भुसा, रंगीत पावडर, तांदळात पांढरे खडे, बासमतीमध्ये स्वस्त तांदूळ मिसळणे, मिरची पावडरमध्ये विट भुकटी. हळद पावडरमध्ये मेटॅनील येलो रंग, मिऱ्यामध्ये पपईच्या बियांची सर्रास भेसळ होते. (शहर प्रतिनिधी)