शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

पालांदुरात तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

लाखनी तालुक्यात पालांदूर सर्वात मोठे गाव. व्यापार सुध्दा मोठाच. दररोजच लहान-मोठे ट्रक, मोठी लॉरी यासारखे वाहन बायपासऐवजी मुख्य एकमेव गावातील रस्त्याने वाहतूक करतात. अरुंद रस्त्यात दोन मोठी वाहने एकमेकांना ओलंडताना पाईप लाईनला समस्या येते. नवीन वाहनधारकाला या पाईपलाईनची किंवा व्हॉल्वची जाणीव नसते. नेमके हेच होत जिल्हा परिषद सदस्य बिंदू कोचे यांच्या घरासमोरील पाईपलाईनचा कठडा ट्रकने तोडला.

ठळक मुद्देजड वाहतुकीने पाईप फुटले : बायपास मार्ग आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : जड वाहतुकीने गावातील नळ पाईपलाईन फुटली. यात पाईपलाईनसह व्हॉल्वचे नुकसान झाल्याने दुरुस्तीला वेळ लागला. त्यामुळे घराघरात पोहचणारी पाणी व्यवस्था कोलमडली. तीन दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने महिलांचा आक्रोश वाढला आहे.लाखनी तालुक्यात पालांदूर सर्वात मोठे गाव. व्यापार सुध्दा मोठाच. दररोजच लहान-मोठे ट्रक, मोठी लॉरी यासारखे वाहन बायपासऐवजी मुख्य एकमेव गावातील रस्त्याने वाहतूक करतात. अरुंद रस्त्यात दोन मोठी वाहने एकमेकांना ओलंडताना पाईप लाईनला समस्या येते. नवीन वाहनधारकाला या पाईपलाईनची किंवा व्हॉल्वची जाणीव नसते. नेमके हेच होत जिल्हा परिषद सदस्य बिंदू कोचे यांच्या घरासमोरील पाईपलाईनचा कठडा ट्रकने तोडला. त्यामुळे अख्खी पाणीपुरवठा व्यवस्था प्रभावित झाली. गत तीन दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने घराघरात बायपासची चर्चा जोर धरीत आहे.पालांदूर बायपास अंतीम टप्प्यात आहे. ग्रामपंचायतमध्ये जाहिरनामा प्रकाशित झाला आहे. उपविभागीय अधिकारी साकोली व बांधकाम विभाग साकोली यांनी त्वरित प्रक्रिया राबवित पालांदूर बायपास पावसाळापूर्वी करावा, अशी मागणी पालांदूरवासीयांनी केली आहे.जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया थंडबस्त्यातपालांदूर बायपास रस्त्याच्या अनुषंगाने एक कोटी ३७ लाख रुपये मंजूर असल्याने कामाला गती द्यावी, प्रभावित शेतकऱ्यांना वास्तविकतेच्या आधारावर न्याय देत जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया लवकर राबविण्यास बायपासला लवकर मुहूर्त मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र अनेक वर्षापासून प्रश्न मार्गी लागत नसल्याने समस्या वाढत आहेत.गावकऱ्यांना एकच मार्ग आहे. यातूनच व्यापारसुध्दा चालतो. मोठे ट्रक गावाबाहेरच थांबवले तर व्यापार प्रभावित होतो. प्रसंगी व्यापारी अडचणीत येतील. सर्वच वाहतूक समस्यांवर बायपास रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. तो त्वरीत झाला पाहिजे.-हेमराज कापसे, उपसरपंच, पालांदूरशक्य तितक्या लवकर नळयोजना दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरु आहेत. किचकट व अडचणीतले काम असल्याने विलंब लागत आहे. शक्यतो उद्याला पाणी घराघरात पोहचू शकते.-धनराज बावनकुळे, ग्रामविकास अधिकारी, पालांदूर

टॅग्स :water shortageपाणीकपात