शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांची कृषी प्रदर्शनाला भेट

By admin | Updated: February 12, 2016 01:23 IST

दिवंगत मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.

जिल्ह्यातील उत्पादन : औचित्य मनोहरभाई पटेल जयंतीचेभंडारा : दिवंगत मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. त्यापूर्वी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळभाज्यांसह विविध पिकांच्या प्रदर्शनीला सिनेअभिनेता सलमान खान, इंडिया टीव्हीचे प्रबंध संचालक रजत शर्मा, मिडीया गुरू सुहेल सेठ यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी भंडारा व गोंदिया या शेतीप्रधान जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून प्रगतशेतीकडे वळल्याचे आणि उत्पादित फळ व पिकांची गुणवत्ता व शरीरासाठी कसे लाभदायक आहेत, हे त्यांना सांगितले. यापूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक प्रात्याक्षिक सादर करीत असायचे यावेळी पहिल्यांदाच खासदार पटेल यांनी कृषी उत्पादनावरील फळपिकांचे प्रदर्शन लावण्यासाठी सांगितले होते. यात प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर, महेंद्र ठाकूर, अंजली ठाकूर, डॉ. दिलीप कापगते, प्रभू डोंगरवार, दीपक चावडा, राणू रहांगडाले, लता रहांगडाले, के.बी. चौहान, चोपराम कापगते, ललित मोहनलाल बिसेन, मुन्ना पाचे, हर्षित जतपेले यांच्यासह काही प्रगत शेतकऱ्यांचे फळ व पिके याठिकाणी ठेवण्यात आले होते. यावेळी धानाची हिरवी पेंडी पाहुण्यांना दाखविण्यासाठी ठेवण्यात आली होती. याशिवाय कोबी, पपई, केळी सोबतच स्ट्राबेरी, शेवग्याच्या शेंगा यासह विविध फळ व भाजीपाले ठेवण्यात आले होते. यावेळी मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, आमदार राजेंद्र जैन, माजी मंत्री अनिल देशमुख, पुर्णा पटेल, प्रजय पटेल, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, माजी आमदार दिलीप बंसोड, मनोहर चंद्रीकापुरे, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)